मुलीला फोनवर लग्नाची मागणी घातली, संतापलेल्या वडिलांनी तरुणाला गावातील खांबाला बांधून ठार मारलं

मुंबई तक

Crime News : एका तरुणाने मोबाईलवरून तरुणीला प्रेमाची मागणी केली. तरुणाने केलेल्या कृतीमुळे त्याला तरुणीच्या वडिलांनी एका खांबाला बांधून बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं गावभर खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीला फोनवर लग्नाचा प्रस्ताव

point

खांबाला बांधून तरुणाला बेदम मारहाण करत ठार केलं

Crime News : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका तरुणाने मोबाईलवरून तरुणीला प्रेमाची मागणी केली. तरुणाने केलेल्या कृतीमुळे त्याला तरुणीच्या वडिलांनी एका खांबाला बांधून बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं गावभर खळबळ उडाली आहे. प्रकरणातील मृत तरुणाचे नाव सुभाष असे होते. 

हे ही वाचा : जनरेटरचं डिझेल तपासण्यास गेली महिला, पंख्यात ओढणी अडकल्याने गळफास बसला, महिलेवर काळाचा घाला

मुलीला फोनवर लग्नाचा प्रस्ताव

घडलेल्या घटनेनुसार, पुरुषोत्तम पंचायतीचा राहिवासी असलेल्या सुभाष सुतारने कांचपाडा पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गावात मुलीला फोनवर लग्नाचा प्रस्ताव मांडला. याबाबतची माहिती मुलीच्या वडिलांना समजली असता, या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. मुलीच्या वडिलांचे नाव भगवान कर असे आहे. 

खांबाला बांधून तरुणाला बेदम मारहाण करत ठार केलं

मुलीचे वडील भगवान कर यांनी सुभाष नावाच्या तरुणाला घरी बोलावले, नंतर एका वाहनातून घटनास्थळी नेले. तिथे एका खांबाला बांधण्यात आले आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याची प्रकृती बिघडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिकांच्या मदतीने सुभाषची कशीबशी सुटका करण्यात आली आणि त्याला तात्काळपणे सिमुलिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला भद्रक रुग्णालयात तात्काळपणे हलवण्यात आले. 

हे ही वाचा : भाच्याने मामाच्या 14 वर्षांच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार, गुप्तांगाला नको तेच... लाज आणणारी घटना

भद्रक रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, या घटनेनं परिसर हादरून गेला आणि संतापाची लाट उसळली. या घटनेनं भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशातच समुलिया पोलिसांनी सांगितलं की, 'मृत तरुणाच्या मेहुण्याने त्याच्या हत्येची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी लवकर कारवाई केली जाईल', असे ते म्हणाले. 

हे वाचलं का?