अल्पवयीन मुलीचे अपहरण करत लैंगिक अत्याचार, आरोपी-पोलिसांमध्ये चकमक
Crime News : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, त्यादरम्यान पोलीस आणि आरोपीदरम्यान चकमक सुरू झाली. याचकमकीदरम्यान पोलिसांनी आरोपींना प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक
चकमकीदरम्यान आरोपी जखमी
Crime News : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची समीर, वलीन आणि सलमान अशी ओळख समोर आली. पीडित मुलगी ही जन्माष्टमीला मंदिरात गेली होती, त्यानंतर तिथून तिला आरोपींनी उचलून नेत एका खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील आहे.
हे ही वाचा : Astrology : शनीचे गोचर 2026, 'या' राशींवर राहणार तीक्ष्ण नजर
पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक
पोलिसांच्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी रेता नांगला गावातील एका जंगलात चकमकीदरम्यान प्रत्युरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात वलीन आणि सलमान दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
परिस्थिती पाहून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. तसेच प्रकरणातील मुख्य आरोपी समीरच्या घटनेदिवशीच मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. इतर दोघेजण घटनास्थळावरून फरार झाले होते, नंतर ते रेता नांगलाच्या जंगलात लपून बसले होते. छपार पोलिसांचे एक पथक त्या परिसरात दाखल झाले, आणि त्यांनी घटनेचा संपूर्ण तपास केला होता.
हे ही वाचा : लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न, पण चारच महिन्यात तलावात आढळले मृतदेह
आत्मसमर्पणाचा इशारा दिला तरीही गोळीबार सुरू
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाई सुरू असताना आरोपींनी पोलीस पथकावर गोळीबार केला होता. आत्मसमर्पणाचा इशारा दिला तरीही गोळीबार सुरू राहिला. यामुळे नंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही आरोपी गोळीबारात जखमी झाले आणि त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींकडून दोन बेकायदेशीररित्या 315 बोअरची गावठी पिस्तूल, तसेच दोन जिवंत काडतुसे आणि रिकामी काडतुसे जप्त करण्यात आली होती.
