तोडगा निघणार कसा? 3 मागण्या ज्यामुळे जरांगे मागे हटतच नाहीयेत..
maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधत 12 सप्टेंबरनंतर मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. हैदराबाद गॅझेट, 58 लाख नोंदी आणि सगेसोयरे या तीन प्रमुख मागण्यांवर सरकारसोबत अद्याप तोडगा निघालेला नाही. नेमक्या मागण्या काय आहेत? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तोडगा निघणार कसा? 3 मागण्या ज्यामुळे जरांगे मागे हटतच नाहीयेत..
..अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका
Maratha Reservation : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आरक्षण दिले जाईल, असा शब्द दिल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. या फोनवर सात ते आठ मिनिटे चर्चा झाल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, दिलेला शब्द आता पाळला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 12 सप्टेंबरनंतर मुंबईत, आझाद मैदान किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : सुनेनं केला उद्योगपती सासऱ्याचा गेम, खतरनाक प्लॅन बनवूनही सापडली, काय घडलं?
मनोज जरांगे पाटलांच्या 3 मागण्या कोणत्या?
जरांगे पाटील यांच्या प्रमुख तीन मागण्यांपैकी पहिली मागणी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले असल्यास त्याच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. दुसरी मागणी 58 लाख नोंदींच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधून काढलेल्या या 58 लाख नोंदींच्या आधारे मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ आणि कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. तिसरी आणि महत्त्वाची मागणी ‘सगेसोयरे’च्या अंमलबजावणीची आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करून कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर पात्र नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे.
हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार
