मध्यरात्री सुनेसमोर नग्नावस्थेत नाचला सासरा, पुढं घडलं भयानक कांड
एका सासऱ्याने मध्यरात्री सुनेसमोर नग्नावस्थेत डान्स केला. त्यावेळी घाबरलेल्या सूनेने आरडा-ओरडा केला. मात्र त्यानंतर एक भयानक प्रकार घडला, पंजाबच्या तरनतारनमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मध्यरात्री सुनेसमोर नग्नावस्थेत नाचला सासरा
पुढं घडलं भयानक कांड
Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसमोर तिच्या सासऱ्याने नग्नावस्थेत डान्स केल्याचा आणि दीराने तिला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी बाप-लेकावर गुन्हा दाखल केला असून, दीर अर्शदीप सिंग याला सोमवारी (7 सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या तरनतारन परिसरातील ही घटना आहे.
मध्यरात्री बारा वाजता काय घडलं?
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली. ती वॉशरूमला गेली होती आणि बाहेर आली तेव्हा घराच्या अंगणात तिचा सासरा दीपक हा नग्नावस्थेत डान्स करत होता. हा सर्व प्रकार पाहून तिने आरडाओरडा केला, ज्याचा आवाज ऐकून तिचा पती जशनदीप रूममधून बाहेर आला. आपल्या वडिलांना अशा आक्षेपार्ह अवस्थेत पाहून त्याने तीव्र आक्षेप नोंदवला. मात्र, याच वेळी दीर अर्शदीप सिंग याने महिलेच्या तोंडावर जोरदार थपडा मारल्या.
हे ही वाचा : घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या पक्षाला अब्जावधींची देणगी
मोबाईलवर बनवला व्हिडीओ
या अनपेक्षित आणि लज्जास्पद प्रकारादरम्यान महिलेने प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईलवर सासऱ्याच्या या गैरकृत्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिने पोलिसांत या घटनेची लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत डीएसपी सुखबीर सिंग यांच्या माहितीनुसार सिटी ठाण्यात तैनात असलेल्या एएसआय मनजीत कौर यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
हे ही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार
सासऱ्याचा वेगळाच दावा
दरम्यान, सासरा दीपक याने पोलिसांसमोर स्वतःचा बचाव करताना एक अजब दावा केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी सुनेने एआयचा वापर करून हा बनावट व्हिडिओ तयार केला असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, सध्यातरी अर्शदीप सिंग याला गजाआड केले आहे व पुढील तपास सुरू आहे.
