आरोपीनं नवरा - बायकोला संपवलं, नंतर मृतदेहावर केले लैंगिक अत्याचार
Crime News : रेल्वे तिकीट विक्रेता आणि त्याच्या पत्नीची जुन्या सरकारी निवासस्थानी हत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एवढंच नसून आरोपीने मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घरात घुसून नवरा-बायकोची केली हत्या
आरोपीने मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला
Crime News : रेल्वे तिकीट विक्रेता आणि त्याच्या पत्नीची जुन्या सरकारी निवासस्थानी हत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची योगेश राजपूत उर्फ पंगा अशी ओळख समोर आली. योगेश हा चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसला आणि अटकेच्या भीतीने त्याने खून केला. याच चकमकीनंतर पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही पायांत गोळ्या झाडून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतुसे देखील जप्त करण्यात आली होती. ही घटना उत्तर प्रदेशातील कन्नोजच्या गुरसाहायगंज पोलीस ठाणे परिसरात 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री घडलीय.
हे ही वाचा : अगं बाई...! कोल्हापुरात 6 डझन रत्नागिरी हापूस अंब्याचा भाव 55,000 रुपयांना
घरात घुसून नवरा-बायकोची केली हत्या
पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी योगेश उर्फ पंगाने सांगितलं की, तो स्टेशनजवळ फिरत असायचा आणि संजीवला तिकीटाचे पैसे घेऊन जाताना पाहायचा. यानंतर तो 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जुन्या सरकारी निवासस्थानात घुसला होता. संजीवला जाग आल्यानंतर त्याने काठीने मारहाण करत ठार केले. त्यानंतर पत्नी आरडा ओरड करू लागली होती, तेव्हा पीडितेचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला होता. नंतर तिच्याच स्कार्फने तिचा गळा दाबून संपवण्यात आलं. त्याने त्यांची दोन वर्षांची मुलगी, तान्या हिला देखील जखमी केलं.
आरोपीने मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला
या घटनेदरम्यान आरोपीने मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला होता, असा पोलिसांचा खळबळजनक दावा आहे. आरोपी योगेशने चौकशी करताना कबूल केलं की, महिलेची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पर्समधील सुमारे पाच हजार रुपये आणि मृत संजीवचे एटीएम कार्ड घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे ओळख पटवून कसारी जंगलाजवळ अटक केली.
हे ही वाचा : घराबाहेर खेळत होती 3 वर्षीय मुलगी, अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
घटनेच्या रात्री घटनास्थळावर दाखल झालेल्या पथकाने आणि श्वान पथकाने पुरावे गोळा केले, त्यानंतर आणखी एक पथक निरानीसाठी बोलावले आणि आरोपीचा शोध सुरू केला. कसारी जंगलाजवळ पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला. आत्मसंरक्षणासाठी केलेल्या या प्रयत्नात आरोपी योगेशच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून तो जखमी झाला. अशातच पोलीस या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई करत आहे.
