कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीवर फावड्याने केला हल्ला, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

Crime News : कौटुंबिक वादातून नवऱ्याने आपल्या पत्नीवर लाठीकाठीने हल्ला करत तिची हत्या केली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी घरातून निघून शेजारच्या परिसरात दुसरीकडे झोपायला गेला. सकाळी जेव्हा आरोपीचा भाऊ घरी आला असता, त्याला महिलेचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पत्नीवर काठ्या आणि फावड्याने हल्ला करत निर्घृणपणे मारहाण

point

महिला मृतावस्थेत घरात आढळली

Crime News : कौटुंबिक वादातून नवऱ्याने आपल्या पत्नीवर लाठीकाठीने हल्ला करत तिची हत्या केली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी घरातून निघून शेजारी झोपायला गेला. सकाळी जेव्हा आरोपीचा भाऊ घरी आला असता, त्याला महिलेचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला. मध्य प्रदेशातील धनपुरी पोलीस ठाणे क्षेत्रातील बडीखुर्द येथील कुदरा टोलामधील ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला होता.  

हे ही वाचा : घराबाहेर खेळत होती 3 वर्षीय मुलगी, अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

पत्नीवर काठ्या आणि फावड्याने हल्ला करत निर्घृणपणे मारहाण

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख रामकुमार बैगा (वय 47) अशी समोर आली. त्याची पत्नी गुडीया बैगासोबत एका कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या रामकुमारने आपल्या पत्नीवर काठ्या आणि फावड्याने हल्ला करत निर्घृणपणे मारहाण केली. गंभीर जखमांमुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी घरी थांबण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपला. उशिरा रात्री ही घटना घडल्याने लोकांना याबाबत समजले नव्हते. 

महिला मृतावस्थेत घरात आढळली

जेव्हा आरोपीचा भाऊ सकाळी घरी आला असता, त्याला गुडीया बैगा ही मृतावस्थेत आढळून आली होती. त्याने आरोपीच्या मुलाशी फोनवरून संपर्क साधला. आपल्या भाच्यासोबत पोलिसांकडे गेले आणि घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी आरोपी राजकुमारला पकडले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. 

हे ही वाचा : बायको परपुरूषासोबत नको त्या स्थितीत, नवऱ्याने पाहिलं अन् कुऱ्हाडीनं दोघांना संपवलं

धनसुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय सिंह गहरवार यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आवश्यक ती कारवाई केली. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.