पत्नीच्या सांगण्यावरून नवरदेव हनीमूनच्या रात्री घराबाहेर पडला, मित्रांनीच त्याला काहीतरी खाऊ घातले... सीसीटीव्हीत झाला कैद

मुंबई तक

Crime News : पत्नीच्या सांगण्यावरून पती हनीमूनच्या दिवशी घराच्या बाहेर पडला होता. नंतर त्याला त्याच्या मित्रांनी काही तरी खाऊ घातले आणि त्याचा शरीरावर परिणाम झाला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हनीमून दिवशी नवरा दिसला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

point

मित्रांच्या आग्रहावरून त्याला काहीतरी खाऊ घातले

Crime News : मेरठच्या मोहसीनचा 27 नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. नंतर मोहसीन वधूला त्याच्या घरी घेऊन आला होता. तेव्हा कुटुंबाने त्याच्या हनीमूनची तयारी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी खोली सजवण्यासाठी सुरुवात केली होती. रात्र झाली आणि वधूला तिच्या खोलीत पाठवण्यात आले होते. वधू लग्नाच्या रात्री बेडवर बसून मोहसीनची वाट बघत होती. मोहसीन खोलीत आला आणि तेवढ्यात वधूने त्याला सांगितलं की, खोलीत अधिकच प्रकाश होता. यानंतर नवविवाहितेनं एक छोटा बल्ब आणला, नंतर मोहसीनला काहीतरी जाणवले आणि रात्री 12 वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. 

हे ही वाचा : दारू पार्टीत मोठा वाद, मित्राच्या बायकोच्या डोक्यात विटेनं हल्ला करत संपवलं, रात्री धक्कादायक कांड

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोहसीनचं दृश्य 

तीन दिवसानंतर तो हरिद्वारमध्ये पोलिसांना सुरक्षित सापडला होता. याच काळात मेरठ पोलिसांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला. तेव्हा गंगेच्या कालव्यात त्याचा शोध घेण्यात आला, एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसून आला होता. त्यानंतर मोहसीन घरी न परतल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पण, तो घरी परतला आहे. 

मित्रांच्या आग्रहावरून मोहसीन काहीतरी खाल्ले...

एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या रात्री मोहसीन भयभीत झाला होता. मेरठ सारधानाचे एसएचओ दिनेश प्रताप सिंह म्हणाले की, त्याने त्याच्या मित्रांच्या आग्रहावरून काहीतरी खाल्ले, त्याचा परिणाम हा त्याच्या शरीरावर झाला होता. नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो घटनास्थळावरून निघून गेला. मोहसीन सध्या त्याच्या कुटुंबासोबतच आहे. लग्नाच्या रात्री त्याच्या मित्रांचा सल्ला ऐकणं हे त्याला चांगलंच महागात पडले. 

हे ही वाचा : आई बाथरूममध्ये गेली, बाहेर येईपर्यंत भावानेच 'त्या' कारणावरून बहिणीचा गळा चिरला

यानंतर त्याने आपल्या वडिलांना एका अनोळखी नंबरवरून फोन केला आणि सांगितलं की, तो हरिद्वार येथे आहे. त्यानंतर मेरठ पोलीस हरिद्वारमध्ये आले होते आणि त्याला पुन्हा मेरठला पाठवण्यात आले. मोहसीन घरी परतताच त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंद दिसून आला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp