रुसलेल्या पत्नीला समजवण्यासाठी गेला, अन् भयंकर कांड घडलं!

Crime News : अहमदाबादमध्ये पत्नीला समजावण्यासाठी गेलेल्या पतीने वादानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. पत्नी रुग्णालयात दाखल असतानाच पतीचा अमरेलीतील ढसा येथे रेल्वे रुळावर मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रुसलेल्या पत्नीला समजवण्यासाठी गेला

point

अन् भयंकर कांड घडलं!

Crime News : पत्नीला समजावण्यासाठी गेलेल्या पतीने वाद वाढल्यानंतर तिच्यावर चाकूने अनेक वार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पत्नीवर हल्ला केल्यानंतर अमरेलीला गेलेल्या पतीचा काही वेळातच ढसा येथील रेल्वे रुळावर मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे अहमदाबाद आणि अमरेलीमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : आंदोलनासाठी गेले अन् नियतीचा घाला, बीडच्या आंदोलकाचा हृदय विकाराने मृत्यू

पत्नीवर चाकूने वार केले, अन् नंतर पतीची आत्महत्या 

अहमदाबादमधील निकोल परिसर आणि अमरेली जिल्ह्यातील ढसा येथे ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, 42 वर्षीय रेखा या अमरेलीतील लाठी येथे पती भावेश बारैया यांच्यासोबत राहत होत्या. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने रेखा या सततच्या भांडणांना कंटाळून सुमारे 10 दिवसांपूर्वी अहमदाबादला आल्या होत्या. त्या निकोल येथे राहणाऱ्या त्यांच्या 37 वर्षीय बहिणी संगीता गोस्वामी यांच्या घरी राहत होत्या. 29 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 5.30 वाजता भावेश निकोल येथे पत्नीला समजावण्यासाठी पोहोचला.

हेही वाचा : इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाचं खोटं अकाउंट बनवलं, पतीला अश्लील व्हिडिओ पाठवले

हल्ल्यानंतर भावेश तेथून निघून गेला

भावेश आणि रेखा यांच्यात सुरुवातीला बातचीत सुरू झाली. मात्र, याचदरम्यान कोणत्यातरी कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद वाढत जाऊन भावेशने रेखा यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने रेखा यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात रेखा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, हल्ल्यानंतर भावेश तेथून निघून गेला. निकोल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून भावेशचा शोध सुरू केला.

तपास सुरू असतानाच पोलिसांना अमरेली जिल्ह्यातील ढसा येथील रेल्वे रुळावर भावेशच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांच्या माहितीनुसार, भावेशने आत्महत्या केली. त्यामुळे एका बाजूला अहमदाबादमध्ये पत्नीवर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली, तर दुसरीकडे काही वेळातच अमरेलीत पतीच्या मृत्यूची बातमी समोर आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता दोन ठिकाणच्या पोलिसांकडून केला जात आहे. निकोल पोलिसांनी रेखा यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर ढसा पोलीस भावेशच्या मृत्यूचा तपास करत आहेत. त्या सकाळी दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि हल्ल्यानंतर भावेश अमरेलीला कसा पोहोचला, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या रेखा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.