लपंडाव खेळताना पाच मुलांकडून 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या कुटुंबीयांचा धक्कादायक आरोप

मुंबई तक

crime news : लपंडाव खेळताना पाच अल्पवयीन मुलांनी मिळून एका 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पाच अल्पवयीन मुलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

point

लपंडाव खेळताना काय घडलं?

Crime News : लपंडाव खेळताना पाच अल्पवयीन मुलांनी मिळून एका 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील तिलहरी टाणे क्षेत्रातील आहे. 

हे ही वाचा : "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं

लपंडाव खेळताना पीडितेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप 

माहितीनुसार, गावातील प्राथमिक शाळेजवळ काही विद्यार्थी लपा छुपी खेळत होते. एक विद्यार्थी शेतात जाऊन लपला होता. शेत मालकाची नजर मुलांवर गेली होती, त्याने मुलांना मुलीसोबत जबरदस्ती करताना पाहिले, त्यानंतर त्याने मुलीला आपल्या आई-वडिलांना बोलावण्यास सांगितले. ही घटना कुटुंबीयांना समजताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी संबंधित मुलांवर गंभीर आरोप लावला. 

आरोपी मुलं अल्पवयीन

या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब आरोपींचं वय होतं. पीडितेच्या बाजूने ज्या पाच विद्यार्थ्यांवर आरोप लावला होता, ते सर्व जण अल्पवयीन होते. काही मुलांचे वय 7 वर्षे होते तर काही मुलांचे 10 तसेच काहींचे 12 वय वर्षे होते. वय आणि प्रकरणाचे गंभीर स्वरुप पाहून आरोपींची चौकशी करण्यात आली होती. 

हे ही वाचा : वर्ग सुरू असतानाच मुख्याध्यापकाने काढली पँट, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे

पोलिसांनी पीडित 9 वर्षीय मुलीला तात्काळपणे वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणारे तिलहारचे पोलीस निरीक्षकाने सांगितलं की, कुटुंबीयांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, सर्व बाबी आणि पुराव्यांची कसून तपासणी सुरू आहे.