8 वी च्या विद्यार्थिनीनं कीटकनाशक पिऊन उचललं टोकाचं पाऊल, परिसरात एकच खळबळ

मुंबई तक

crime news : सोमवारी उपचारादरम्यान, इयत्ता 8 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने कीटकनाशक पिऊन टोकाचं पाऊल उचललं. स्थानिकांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले, नंतर प्रथमोपचारानंतर, डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी भागलपूर येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले, जिथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

इयत्ता 8 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने कीटकनाशक पिऊन टोकाचं पाऊल उचललं

point

मुलीने कीटकनाशक का प्यायलं?

Crime News : बिहारच्या भगलपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. सोमवारी उपचारादरम्यान, इयत्ता 8 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने कीटकनाशक पिऊन टोकाचं पाऊल उचललं. स्थानिकांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले, नंतर प्रथमोपचारानंतर, डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी भागलपूर येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले, जिथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा : नागपूर: हनुमान जयंतीला मुलाचं अपहरण, 45 लाख रुपये खंडणीची मागणी, उंदीर मारण्याचं औषध देऊन गळा आवळून संपवलं

कीटकनाशक प्यायल्याने मुलीला उलट्या होऊ लागल्या 

कुटुंबियांच्या माहितीनुसार, मृत मुलीची मानसिकता स्थिर नव्हती. कुटुंबीय घरी आले असता, मुलीला उलट्या होऊ लागल्या होत्या. एकूण प्रकरण समजून घेतल्यानंतर मुलीने विष प्राशन केल्याची माहिती समोर आली. 

घरात कोणाताही वाद नसताना मुलीचं टोकाचं पाऊल 

मृत मुलीचे आजोबा, रामभू राय यांनी सांगितलं की, घरातील सदस्य कामासाठी बाहेर पडले असता, मुलगी घरात एकटीच होती. मुलगी तणावात असल्याचा संशय आहे. संबंधित प्रकरणात त्यांनी पुढे सांगितलं की, घरात कोणाताही वाद नव्हता, या घटनेनं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत नंतर शवविच्छेदनासाठी पाठवला.

हे ही वाचा : पत्नी तरुणासोबतच्या शारीरिक संबंधांना चटावली, पतीचा प्रायव्हेट पार्ट अर्धवट कापला अन्...

दरम्यान, या प्रकरणात शाळकरी मुलीने कीटकनाशक का प्यायलं असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. संबंधित प्रकरणात पोलीस तपास करत असून पुढील तपासातून मृत्यूमागील कारण समोर येईल अशी शक्यता आहे. 

हे वाचलं का?