काकाने 3 वर्षाच्या मुलीला शेतात नेत नको तेच... इतर दोघांचा समावेश, नात्याला लाज आणणारी घटना

मुंबई तक

Crime News : नराधम काकाने त्याच्या तीन वर्षांच्या पुतणीला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. या अत्याचारात दोघांचा समावेश असल्याचे उघडकीस आलं आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

काकाने मुलीचं अपहण करून शेतात नेलं नंतर नको तेच...

point

मुलीच्या किंकाळ्यामुळे गावकरी सावध

Crime News : बिहारची राजधानी पाटणा येथून एक लाज आणणारी घटना घडल्याचे चित्र आहे.  नराधम काकाने त्याच्या तीन वर्षांच्या पुतणीला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. या अत्याचारात दोघांचा समावेश असल्याचे उघडकीस आलं आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हे ही वाचा : नवऱ्याने रागाच्या भरात बायकोचा गळा चिरला, नंतर रात्रभर बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला, पुढे... भयंकर कांड

काकाने मुलीचं अपहण करून शेतात नेलं नंतर नको तेच...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना परसा बाजार पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा हा धक्कादायक प्रकार घडला तेव्हा निष्पाप मुलगी घरात झोपली होती. रात्री साडेअकरा वाजता, आरोपी काकाने तिचे अपहरण केलं, नंतर एका शेतात नेले, दोघांनी मिळून तिच्याशी घृणास्पद कृत्य केले.

मुलीच्या किंकाळ्यामुळे गावकरी सावध

संबंधित प्रकरणातील आरोपी हा अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे म्हटले जातेय. या घटनेदरम्यान मुलीच्या किंकाळ्यामुळे जवळचे गावकरी सावध झाले. यानंतर सुरुवातीला त्यांना वाटलं की, कोणीतरी चोरटा गावात घुसला आहे. मात्र, गावकरी हे आवाजाच्या दिशेने धावले. पण तोवर आरोपी मुलीला गंभीर अवस्थेत पाहून घटनास्थळावरून पळाले. कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत माहिती दिली. 

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी 

प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला तात्काळपणे जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने पीडितेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं आहे. या घटनेदरम्यान परिसरात एकच संतापाची लाट उसळली. स्थानिक लोक आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करू लागले आहेत. 

हे वाचलं का?