पीडितेशी शरीरसंबंध ठेवले, नंतर मुलाच्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ केला शेअर, महिलेनं रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

मुंबई तक

crime news : व्यक्तीने महिलेशी अनेकदा लैंगिक संबंध ठेवून कंत्राटदाराच्या संगनमतीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महिलेनं काम करण्यास नकार दिला असता, त्याने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. नंतर तोच डेटा तिच्या मुलाच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केला.

ADVERTISEMENT

घरी परतल्यानंतर मुलाचा मृतदेह आढळला
घरी परतल्यानंतर मुलाचा मृतदेह आढळला
google news

बातम्या हायलाइट

point

पीडित मजुर महिलेशी अनैतिक संबंध ठेवत फोटो-व्हिडिओ केले रेकॉर्ड

point

महिलेचे व्हिडिओ मुलाच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केले

Crime News : एका व्यक्तीने महिलेशी अनेकदा लैंगिक संबंध ठेवून कंत्राटदाराच्या संगनमतीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महिलेनं काम करण्यास नकार दिला असता, त्याने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. नंतर तोच डेटा तिच्या मुलाच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता. पीडित महिला व्यथित होऊन तिनं रेल्वेखाली जाऊन जीवन संपवलं, संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीच्या पोटात चार महिन्यांचं बाळ, नराधमाचा मुलीवर पाशवी बलात्कार

पीडित मजुर महिलेशी अनैतिक संबंध ठेवत फोटो-व्हिडिओ केले रेकॉर्ड

कबराई ठाण्यात एका गावातील तरुणाने सांगितलं की, पत्नी चनीकला कबराई (वय 40) या बच्चू कुशवाह या कंत्राटदाराकडे बांधकामात मजूर म्हणून काम करत होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कल्याण प्रजापतीने महिलेशी अनैतिक संबंध ठेवले आणि पीडितेशी शरीरसंबंध ठेवले होते. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. कल्याण- कंत्राटदाराच्या मुलांनी मिळून त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 

महिलेचे व्हिडिओ मुलाच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केले

पत्नीने काम करण्यास नकार दिला असता, तेव्हा लोकांनी 16 मार्च रोजी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. संबंधित फोटो आणि व्हिडिओ पीडितेच्या मुलाच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केला. याच कृत्यांना कंटाळून पत्नीने 17 मार्च रोजी सकाळी बारीपुरा रेल्वे स्थानकावरील रेल्वेखाली येऊन जीवन संपवलं.

हे ही वाचा : धक्कादायक... डोसा खाल्ला अन् दोन छोट्या मुलींचा गेला जीव, आई-वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक

या घटनेनं पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचली होती. पतीने 5 एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात माहिती  दिली. पोलिसांनी कारवाई नोंदवली आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला. 

हे वाचलं का?