"पप्पांनी माझ्यावर बलात्कार केलाय..", मुलीने आईला सांगितलं..अन् काय घडलं?

मुंबई तक

Crime News : झारखंडमधील कोडरमा येथे अल्पवयीन मुलीने वडिलांनी बलात्कार केल्याचे आईला सांगितल्यानंतर आईने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून न्यायालयात हजर केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"पप्पांनी माझ्यावर बलात्कार केलाय.."

point

मुलीने आईला सांगितलं..अन् काय घडलं?

Crime News : झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोडरमाच्या लोकाई परिसरात ही घटना घडली. अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीने आईकडे आपल्यासोबत वडिलांनी बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर आईने पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

हेही वाचा : मुंबई : सर्वांना सोडलं, शेवटी स्कूल बसमध्ये चिमुरडी एकटी राहिली, ड्रायव्हरने केला अत्याचार

आरोपीला न्यायालयीन कोठडी

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. अल्पवयीन मुलीने आईला दिलेल्या माहितीनंतर आईने पोलिसांकडे धाव घेतल्याने या प्रकरणाची माहिती समोर आली. पोलिसांनी तक्रारीवर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

हेही वाचा : भल्या मोठ्या कोयत्याने थेट माजी नगरसेवकावर सपासप वार अन् आरोपी सगळ्यांसमोरून निवांत गेला निघून!