दोघांसोबत विवाह, तिसऱ्या पुरुषाकडून दिवस गेले.. 'त्या' महिलेसोबत घडलं सगळंच विचित्र!
Crime News : एका महिलेचा मृतदेह एका भाड्याच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत दिसून आला होता. मृत महिलेचं नाव अंगुरी (वय 28) असे आहे. याच अंगुरीच्या बाबतीत जे व्हायला नको होतं तेच घडलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंगुरीचा गळा दाबून महिलेचा मृत्यू
विशालसोबतचे नातेही फार काळ टिकले नाही
नेमकं काय घडलं?
Crime News : एका महिलेचा मृतदेह एका भाड्याच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत दिसून आला होता. मृत महिलेचं नाव अंगुरी (वय 28) असे आहे. याच अंगुरीच्या बाबतीत जे व्हायला नको होतं तेच घडलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, अंगुरी ही 7 महिन्यांपूर्वी गर्भवती होती. अंगुरीच्या संबंधात पोलिसांनी सांगितलेल्या घटनेमुळे तुमचंही मन हेलावून जाईल. अंगुरीचा लिव्ह इन पार्टनर अनुज (वय 30) याला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : दुधात औषध मिसळत पतीचे हातपाय बांधले... 57 वर्षीय डॉक्टरच्या पत्नीचा इलेक्ट्रिशियन पुरुषावर जडला जीव, हत्येचा कट...
अंगुरीचा गळा दाबून महिलेचा मृत्यू
अनुजने पोलिसांना सांगितलं की, 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचे अंगुरीसोबत आर्थिक व्यवहावरून वादंग निर्माण झाला. रागाच्याभरातच अंगुरीचा गळा दोन्ही हातांनी धरला आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनं अनुज भयभीत झाल्याचे चित्र आहे आणि नंतर खोली बंद करून तो त्या ठिकाणाहून पळून गेला.
विशालसोबतचे नातेही फार काळ टिकले नाही
या प्रकरणात अनुजने खुलासा केला की, अंगुरीने सुरुवातीला 2023 मध्ये मोहम्मद सदरुद्दीनशी विवाह केला होता. त्यानंतर ती लवकरच त्याच्यापासून वेगळी झाली आणि नंतर 2024 मध्ये विशालसोबत कोर्ट मॅरेज केलं. अंगुरीचे विशालसोबतचे नातेही फार काळ टिकले नाही. याच काळात आरोपी अनुजच्या संपर्कातच होती. त्यानंतर तो तिच्या भाड्याच्या खोलीत येऊ लागला होता.
हे ही वाचा : तरुणाच्या गळ्यात जिवंत साप, गाडीवर जाताना करु लागला किस, व्हिडिओ तुफान व्हायरल
अनुजचे आणि आरोपीचे अनेकदा संबंध देखील निर्माण झाले होते. यामुळे अंगुरीची गर्भधारणा झाली आहे. असे वृत्त आहे की, गर्भधारणेनंतर अंगुरीने अनुजवर पैशासाठी दबाव आणला होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागला होता. अशातच आता पोलिस या प्रकरणाचा अधिकच तपास केला आहे.










