आईसोबत तरुण गेला पळून, 6 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य अन् सिगारेटचे चटके

मुंबई तक

crime news : महिलेसोबत पळून गेलेल्या व्यक्तीने एका 6 वर्षीय मुलीला चुकीचा स्पर्श केला. तिला सिगारेटचे अनेक चटके पीडितेच्या ओठांवर आणि हातावर दिले होते. लहान मुलीने जेव्हा विरोध केला असता, तिला बेदम मारहाण केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीचा 6 वर्षीय मुलीला चुकीचा स्पर्श

point

पीडितेच्या ओठांवर आणि हातावर चटके

Crime News : महिलेसोबत पळून गेलेल्या व्यक्तीने एका 6 वर्षीय मुलीला चुकीचा स्पर्श केला. तिच्या ओठांवर आणि हातावर सिगारेटचे चटके दिले होते. लहान मुलीने जेव्हा विरोध केला असता, तिला बेदम मारहाण केली. नंतर त्यांना भीती दाखवली आणि धमकावले, नंतर त्यांना घरातील काम करण्यास भाग पाडले होते. ही घटना हरियाणातील पानीपत येथील आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

हे ही वाचा : चॅनेल बदलण्यावरून वाद, पत्नीने नवऱ्यावर विळ्याने हल्ला करत.. भयंकर घडलं

संबंधित प्रकरणाची मुलांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली असता, पीडितांच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केलं की, पत्नी आपल्या प्रियकरासोबत 5 तोळे सोने आणि पैसे घेऊन पळून गेले होते. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेली असता, तो महिलेसोबत फरार झाला. चारही मुलांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. पीडित वडिलांनी तक्रार दाखल केली असता, आरोपीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.   

नेमकं घडलं काय? 

10 जुलै रोजी नवरा ड्युटीवर गेल्यानंतर महिला आपल्या प्रियकरासोबत 5 तोळे सोने, 65 हजार रुपये आणि चारही मुलांना घेऊन ती गेली होती. काही दिवस वाट पाहिल्यानंतर एका अज्ञात क्रमांकावरून महिलेचा सुगावा लागला होता. पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली होती. 

लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन छापा टाकला होता. पोलिसांनी पाहून आरोपी आणि महिला घटनास्थळावरून पळून गेले. तेव्हा पोलिसांनी चारही मुलांना आपल्या वडिलांकडे सुपूर्द केले होते. मुलं घरी पोहोचल्यानंतर ते खूपच भयभीत झाले होते. तेव्हा वडिलांनी मुलांना विचारलं असता, पीडित मुलांनी सांगितलं की, आरोपी हा दररोज दारू पिऊन यायचा आणि मारहाण करायचा.