'झेंडा फडकवायला चल,' असं सांगत घरी बोलावून तरुणावर गोळीबार
Crime News : स्वातंत्र्य दिना दिवशी एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला होता. देशभक्तीच्या नावाखाली एका तरुणावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. स्वातंत्र दिना दिवशी झालेल्या खूनामुळे परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राष्ट्रध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमाला ये सांगत बोलावलं
गोळीबार करत हत्या
Crime News : स्वातंत्र्य दिना दिवशी एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला होता. देशभक्तीच्या नावाखाली एका तरुणावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. मृत तरुणाची वीरू कुमार (वय 26) अशी ओळख समोर आली. स्वातंत्र दिना दिवशी झालेल्या खूनामुळे परिसर हादरून गेला. ही घटना बिहारच्या पटना येथील अनुमंडल क्षेत्रातील आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हे ही वाचा : इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..
राष्ट्रध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमाला ये सांगत बोलावलं
संबंधित घटनेनं प्रत्यक्षदर्शिनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. स्वातंत्र्य दिनी सोनू कुमार नावाचा व्यक्ती वीरू नावाच्या तरुणाच्या घरी पोहोचला आणि त्याला राष्ट्रध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमाला ये असं सांगितलं होते. तेव्हा वीरूने सांगितलं की, मी अंघोळ करून पोहोचतो. नंतर काही वेळांतच संबंधित व्यक्तीच्या अजीत कुमार आणि प्रिंस कुमार या दोन भाच्यांनी मिळून वीरूच्या घरी जाऊन त्याला बाहेर आणले.
गोळीबार करत हत्या
याचदरम्यान, काही वेळानंतर ग्रामस्थांनी सूचना देत सांगितलं की, वीरूवर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली होती. पीडितेचा रक्ताने माखलेला मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची सूचना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत कारवाई केली आणि शवविच्छेदन अनुमंडल रुग्णालयात पाठवला.
हे ही वाचा : बारामती : पतीला बाल्कनीत पुरण्याचा प्रयत्न; गवंड्यामुळे पत्नीचा धक्कादायक प्लॅन उघड
दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि मृत हे एकमेकांचे मित्र होते. आरोपीने वीरूच्या डोक्यात गोळीबार करत संपवलं, नंतर घटनास्थळी पीडिताचा मृत्यू झाला. जुन्या पैशांच्या वादातील हे प्रकरण असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. संबंधित प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
