10 वर्षांपासून सूड उगवण्याची वाट पाहात होता, संधी मिळताच तरुणाचा गळा चिरला, बापाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेतला
Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनोद राय आणि आरोपी अरुण कुमार यांच्या कुटुंबात 2017 पासून वाद सुरू होता. 2017 मध्ये विनोदने आपल्या शेतात सिंचनासाठी विजेची तार लावली होती, ज्याचा स्पर्श झाल्याने अरुण कुमारच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अरुण हा विनोदचा द्वेष करत होता आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही देत होता, असा आरोप विनोदच्या भावाने केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वर्षांपासून सूड उगवण्याची वाट पाहात होता
संधी मिळताच तरुणाचा गळा चिरला
बापाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेतला
Crime News : जुन्या वादातून एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मुजफ्फरपूर-शिवहर सीमेवरील एका गव्हाच्या शेतात पोलिसांना तरुणाचा मृतदेह आढळून आला. विनोद राय असे मृत तरुणाचे नाव असून तो गंगा धरमपुर येथील रहिवासी होता. ही खळबळजनक घटना बिहारमधील शिवहर जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनोद राय आणि आरोपी अरुण कुमार यांच्या कुटुंबात 2017 पासून वाद सुरू होता. 2017 मध्ये विनोदने आपल्या शेतात सिंचनासाठी विजेची तार लावली होती, ज्याचा स्पर्श झाल्याने अरुण कुमारच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अरुण हा विनोदचा द्वेष करत होता आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही देत होता, असा आरोप विनोदच्या भावाने केला आहे. हत्येच्या दिवशी अरुणने विनोदला विश्वासात घेऊन शेजारील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील गंगटी बाजार येथे नेले आणि तिथे दोघांनी नशा केली.
हेही वाचा : प्रेयसी म्हणाली, 'तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, 10 लाख रुपये दे..' पुरुषानं विष पिऊन उचललं टोकाचं पाऊल
त्यानंतर रात्रीच्या सुमारास गावाजवळील एका निर्जन स्थळी नेऊन आरोपीने विनोदवर चाकूने अर्धा डझन वार केले. शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आढळल्या असून, धारदार शस्त्राने गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह गव्हाच्या शेतात फेकून दिला आणि तो आपल्या बहिणीच्या घरी पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सुशील कुमार आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.










