शिक्षक बापाला संपवून मुलाची मेट्रोखाली आत्महत्या! 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
नोएडातील एकाकी अवस्थेत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. गेली अनेक दिवस तो नैराश्यात होता. वडिलांची हत्या केल्यानंतर त्या मुलाने प्राणघातक पाऊल उचलले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षक बापाला संपवून मुलाची मेट्रोखाली आत्महत्या!
'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
Crime News : एका 15 वर्षीय मुलाच्या धक्कादायक कृतीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर काही वेळातच त्याने स्वतःही मेट्रोसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. या भयंकर घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, यामागचे कारण अतिशय वेदनादायी असल्याचे समोर आले आहे. दिल्ली-एनसीआरच्या नोएडा परिसरातील ही घटना आहे.
आई-वडिलांचा घटस्फोट अन् एकाकीपण
मिळालेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय राजू शर्मा हे आपला 15 वर्षांचा मुलगा अमृतसोबत गढी चौखंडी गावातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भाड्याने राहत होते. राजू शर्मा हे व्यवसायाने शिक्षक होते आणि घरोघरी जाऊन मुलांना ट्यूशन शिकवत असत. मात्र, दुसऱ्यांच्या मुलांना शिकवणाऱ्या या पित्याने स्वतःच्या मुलाला कधीही शाळेत पाठवले नाही किंवा त्याला घराबाहेरही पडू दिले नाही. अमृतच्या आई-वडिलांचा 10-12 वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अमृतला घरात कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती, त्याचा कोणीही मित्र नव्हता आणि तो बाह्य जगापासून पूर्णपणे तुटलेला, एकाकी आणि बंदिस्त जीवन जगत होता.
हे ही वाचा : मुलीला आई बॉयफ्रेंडसोबत 'तसल्या' अवस्थेत दिसली, वडिलांना सांगणार इतक्यात...
कुऱ्हाडीनं केले वार
अनेक वर्षांपासून घरातच कोंडून राहिल्यामुळे अमृतमध्ये प्रचंड नैराश्य (फ्रस्ट्रेशन) आणि संताप निर्माण झाला होता. याच घुसमटीतून त्याने हे भयंकर पाऊल उचलले. त्याने एका कुऱ्हाडीची व्यवस्था केली आणि वडील घरी येताच त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांना मृत्यूच्या घाटात उतरवले. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, वडिलांच्या हत्येनंतर अमृतला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चात्ताप झाला. तो वडिलांच्या छायाचित्रासमोर बसून खूप रडला आणि भावुक होऊन त्याने त्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
हे ही वाचा : बॉलिवूडच्या 3 अभिनेत्यांना अन्न FDA ची कारणे दाखवा नोटीस, 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
आत्महत्येनं शेवट
वडिलांची हत्या करून आणि त्यांच्यासमोर रडल्यानंतर अमृतने अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बदलले. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला आणि थेट नोएडातील सेक्टर-52 मेट्रो स्थानकावर पोहोचला. तिथे त्याने धावत्या मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. एकाकीपण आणि नैराश्यातून घडलेल्या या दुहेरी मृत्यूच्या घटनेने समाजमनाला सुन्न केले असून, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
