बॉलिवूडच्या 3 अभिनेत्यांना FDA ची कारणे दाखवा नोटीस, 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
Maharashtra FDA Show Cause Notice to Bollywood Actors : अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’ जाहिरातीतील सहभागाबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या जाहिरातीमधून प्रतिबंधित ‘विमल पान मसाला’चा अप्रत्यक्ष प्रचार होतोय का, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बॉलिवूडच्या 3 अभिनेत्यांना अन्न औषध प्रशासनाची नोटीस
15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
Maharashtra FDA Show Cause Notice to Bollywood Actors : अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘विमल’ ब्रँडच्या ‘VIMAL Elaichi’ जाहिरातीमध्ये सहभागी झाल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’चा अप्रत्यक्षपणे प्रचार होतोय का, याबाबत प्रशासनाने तिन्ही अभिनेत्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. संबंधित जाहिरात टीव्ही, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर प्रसारित होत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : आईला 'तो' मेसेज आला, घरमालकाने दार उघडताच भयंकर दृश्य दिसलं, इंजिनिअर दाम्पत्यासोबत काय घडलं?
अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ‘VIMAL Elaichi’ या नावाने जाहिरात करण्यात आली असली तरी ‘VIMAL’ हा ब्रँड पान मसाल्याशी मोठ्या प्रमाणावर जोडला जातो. त्यामुळे या जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात ‘विमल पान मसाला’ची आठवण किंवा ओळख कायम राहण्याची शक्यता आहे का? याची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित पान मसाला उत्पादनाच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी असल्याचे प्रशासनाने नोटीसमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा : शाळेतील मुलींनी मांडल्या व्यथा, थेट झाडाझडती; दीपके कुणावर संतापले?
