आईला 'तो' मेसेज आला, घरमालकाने दार उघडताच भयंकर दृश्य दिसलं, इंजिनिअर दाम्पत्यासोबत काय घडलं?
bengaluru crime news : बंगळुरूमध्ये घरगुती वादानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर पद्मावतीची कथित हत्या झाल्याचा संशय असून तिचा पती सुमंत जैन मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईला 'तो' मेसेज आला
घरमालकाने दार उघडताच भयंकर दृश्य दिसलं,
इंजिनिअर दाम्पत्यासोबत काय घडलं?
bengaluru crime news : बंगळुरूमध्ये घरगुती वादानंतर एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची कथितपणे हत्या झाल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय, पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ही घटना राजेश्वरी नगरमधील हेग्गनहळ्ळी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची ओळख 29 वर्षीय पद्मावती आणि 32 वर्षीय सुमंत जैन अशी झाली आहे. सुमंत सिव्हिल इंजिनिअर होता, तर पद्मावती एका कॅब कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दाम्पत्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूप हिंसक झाले. आरोप आहे की, सुमंतने पद्मावतीच्या चेहऱ्यावर वार केला आणि त्यानंतर उशीने तिचे तोंड दाबले. यामुळेच पद्मावतीचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
हेही वाचा : शिंदेंचा उल्लेख करत दीपके चिडले, फडणवीस सरकारला घेरण्याचे संकेत?
सुमंतने आपल्या आईला एक मेसेज पाठवला, अन् नंतर काय घडलं?
घटनेनंतर सुमंतने पद्मावतीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. पत्नीचा श्वास सुरू नसल्याचे जाणवल्यानंतर सुमंत घाबरला. त्यानंतर त्याने कथितपणे आपल्या आईला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुमंतने आपल्या आईला एक मेसेजही पाठवला होता. हा मेसेज पाहिल्यानंतर त्याच्या आईने घरमालकाशी संपर्क साधला. त्यानंतर घर उघडण्यात आले असता आतचे दृश्य पाहून लोकांना धक्का बसला. घराच्या हॉलमध्ये सुमंतचा मृतदेह सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पद्मावती मृतावस्थेत पडलेली होती. माहिती मिळताच राजगोपाल नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.
हेही वाचा : लव्ह मॅरेज, बाळही झालं अन् नंतर हत्या, स्वीटी पटेल केसमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप
