लव्ह मॅरेज, बाळही झालं अन् नंतर हत्या, स्वीटी पटेल केसमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप
Crime News : गुजरातमधील चर्चित स्वीटी पटेल हत्याकांडात करजन कोर्टाने माजी पोलीस निरीक्षक अजय देसाई यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्या आणि पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी सहआरोपी किरीटसिंह जडेजेंनाही पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लव्ह मॅरेज, बाळही झालं अन् नंतर हत्या,
स्वीटी पटेल केसमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप
Crime News : गुजरातमधील चर्चित स्वीटी पटेल हत्याकांडात करजन कोर्टाने मृतक स्वीटी पटेलचा पती आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय देसाई यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हत्या करण्याचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली सहआरोपी किरीटसिंह जडेजे यांनाही न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि प्रकरणातील पुरावे विचारात घेतल्यानंतर हा गंभीर प्रकार असल्याचे नमूद केले. पोलीस अधिकारी असूनही अजय देसाईंनी बंद घरात आपल्या पत्नीची हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले.
हेही वाचा : इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..
37 वर्षीय स्वीटी पटेल ही आनंद जिल्ह्यातील उमरेठ तालुक्यातील पंसोरा गावची रहिवासी होती. तिने त्याच गावातील हेतस पांड्या याच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहातून त्यांना दोन मुले झाली. मात्र 2014 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2015 मध्ये स्वीटीची PSI अजय देसाई यांच्याशी भेट झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि 2016 मध्ये त्यांनी रूपाल येथील एका मंदिरात गंधर्व विवाह केला. 2019 मध्ये या विवाहातून स्वीटीला एका मुलाचा जन्म झाला. दरम्यान, अजय देसाईंनी 2017 मध्ये आपल्या समाजातील दुसऱ्या तरुणीशी कायदेशीर विवाह केला होता. यामुळे स्वीटी आणि अजय यांच्यात अनेकदा वाद होत होते. अजयने आपल्यासोबतच्या विवाहाची सार्वजनिकरित्या कबुली द्यावी, अशी स्वीटीची इच्छा होती. याच कारणावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाच्या प्रगतीला गती देणार 'शक्तीची सप्तधारा'
