आई अन् मुलीनं मिळून बापाला संपवलं, एक महिन्यानंतर उलगडलं रहस्य; नेमकं काय घडलं?
एका तरुणीने तिच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रायबरेलीतील हे प्रकरण असून यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आई अन् मुलीनं मिळून बापाला संपवलं
एक महिन्यानंतर उलगडलं रहस्य
नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एका धक्कादायक घटनेत, एका तरुणीने तिच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकरण रायबरेलीच्या हरचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बराईन गावातील असून, या भयंकर गुन्ह्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होती. पोलिसांनी मुलीकडे केलेल्या चौकशीनंतर घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर खोदकाम केले असता खड्ड्यात वडिलांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटात आणि हत्येमध्ये मुलीला तिच्या आईनेही साथ दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
नात्याला वडिलांचा विरोध
छोटेलाल असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते 17 जुलैपासून बेपत्ता होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीने स्वतः या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते आणि तिचे वडील या नात्याला कडाडून विरोध करत होते. आपला हाच विरोध वडिलांच्या जीवावर बेतला. प्रेमप्रकरणात वडील अडथळा बनत असल्याच्या रागातून मुलीने आपल्या आईच्या मदतीने त्यांची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह घराजवळील एका खड्ड्यात पुरून टाकला.
हे ही वाचा : इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..
बापाला संपवण्यात आईची साथ
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलीला समजावण्याऐवजी आईनेच तिला या भयंकर कृत्यात साथ दिली आणि त्यानंतर तब्बल एक महिना ती आपल्या मुलाचीही (मृत व्यक्तीच्या मुलाची) दिशाभूल करत राहिली. एक महिना उलटून गेल्यानंतरही वडील घरी न परतल्याने मुलगा गावी परतला आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी जेव्हा आई आणि मुलीची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी हत्येची धक्कादायक कबुली दिली.
हे ही वाचा : बारामती : पतीला बाल्कनीत पुरण्याचा प्रयत्न; गवंड्यामुळे पत्नीचा धक्कादायक प्लॅन उघड
घराजवळ पुरला मृतदेह
आई आणि मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घराजवळच्या खड्ड्यातून मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी मायलेकींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या हत्या प्रकरणात आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात इतर आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस आता बारकाईने तपास करत आहेत.
