आईचा मृत्यू, व्यसनी बाप; अनाथाश्रमात 10 वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर

मुंबई तक

उदयपूरमधील एका अनाथाश्रमातून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका दहा वर्षाच्या मुलीवर लैंगित अत्याचार करण्यात आला आहे. यामधील आरोपी नेमका कोण आहे, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईचा मृत्यू, व्यसनी बाप

point

अनाथाश्रमात 10 वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर

Crime News : राजस्थानच्या उदयपूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका अनाथाश्रमात 10 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, या आश्रमाच्या महिला संचालिकेचा सख्खा भाऊच आहे, जो गेल्या काही काळापासून हे अत्यंत घृणास्पद कृत्य करत होता.

संचालिकेच्या भावाने केले लैंगिक शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, या पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिचा वडील मजुरी करतो आणि त्याला दारूचे प्रचंड व्यसन आहे. ही त्याची एकुलती एक मुलगी असून, दारूच्या आहारी गेलेल्या या बापाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी तिला या आश्रमात आणून सोडले होते. त्यानंतर तो कधीही आपल्या मुलीची साधी विचारपूस करण्यासाठीही परत फिरकला नाही. मुलीच्या याच लाचारीचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत आश्रमाच्या संचालिकेच्या भावाने तिचे वारंवार लैंगिक शोषण केले.

हे ही वाचा : बारामती : पतीला बाल्कनीत पुरण्याचा प्रयत्न; गवंड्यामुळे पत्नीचा धक्कादायक प्लॅन उघड

जुन्या शाळेतील शिक्षकाला सांगितला प्रकार

या पीडित चिमुरडीने आपल्यावर ओढवलेल्या या भयंकर प्रसंगाची तक्रार अनेकदा आश्रमाच्या संचालिकेकडे केली होती. मात्र, संवेदनशीलता दाखवून भावाला थांबवण्याऐवजी त्या संचालिकेने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मुलीलाच गप्प राहण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा तेव्हा झाला, जेव्हा या मुलीच्या जुन्या शाळेतील एक शिक्षक तिची भेट घेण्यासाठी आश्रमात पोहोचले. त्यावेळी प्रचंड घाबरलेल्या आणि रडणाऱ्या मुलीने त्या शिक्षकाला आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली. यानंतर शिक्षकाने तातडीने सतर्कता दाखवत 'चाइल्ड लाईन'कडे या संदर्भात अधिकृत तक्रार नोंदवली.

हे ही वाचा : Independence Day LIVE: स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन

संचालिकेवर कठोर कारवाई

तक्रार मिळताच चाईल्ड लाईन आणि प्रशासकीय यंत्रणेने तत्परता दाखवत मुलीची आश्रमातून सुखरूप सुटका केली आणि तिला बाल कल्याण समितीसमोर (CWC) हजर केले. समितीच्या अध्यक्षा यशोदा पनिहार यांनी केलेल्या समुपदेशनादरम्यान, मुलीने "मला पुन्हा त्या आश्रमात जायचे नाही" अशी भीती व्यक्त केली. समितीच्या निर्देशानुसार पीडितेला सध्या शासकीय बालिकागृहात सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एसपी डॉ. अमृता दुहन यांनी शासकीय बालिकागृहाला अचानक भेट देऊन पीडित मुलीशी एकटेपणाने संवाद साधला व तिचे सविस्तर जबाब नोंदवून घेतले. तसेच, आरोपी आणि त्याला साथ देणाऱ्या संचालिकेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.