'आपण आता थांबू शकत नाहीत',..पीएम मोदींचा देशवासियांना मोठा संदेश
PM Narendra Modi red fort speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या प्रगतीचा वेग थांबवता येणार नसल्याचा संदेश दिला. 2047 च्या विकसित भारताच्या लक्ष्याचा उल्लेख करत त्यांनी आत्मनिर्भरता, सुधारणा आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची पोहोच वाढवण्याचे आवाहन केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आपण आता थांबू शकत नाहीत',
पीएम मोदींचा देशवासियांना मोठा संदेश
PM Narendra Modi red fort speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना भारताच्या प्रगतीचा वेग थांबवता येणार नसल्याचा संदेश दिला. “आपण आता रुकू शकत नाही”, असे सांगत त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाने अधिक वेगाने पुढे जाण्याची गरज व्यक्त केली. भारत जगाच्या मागे राहू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने इंधनाच्या नव्या क्षेत्राला स्पर्श केला असून देशात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही जगातील सर्वात लांब आणि ताकदवान हायड्रोजन ट्रेन असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून भारत 2047 च्या लक्ष्याच्या दिशेने सातत्याने पुढे जात असल्याचे मोदी म्हणाले.
हेही वाचा : आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न
संकटाच्या काळातही भारताने परिस्थितीचा सामना केला - मोदी
गेल्या दशकभरात देशाने कोरोना महामारी, युद्धजन्य परिस्थिती आणि पश्चिम आशियातील तणावासारख्या अनेक संकटांचा सामना केल्याचे मोदी यांनी सांगितले. या काळात भारताला घाबरवण्यासाठी अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या, असा दावा त्यांनी केला. कोविडच्या काळात लस मिळणार नाही, लोक वाचणार नाहीत, तसेच पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांचा तुटवडा निर्माण होईल, अशा चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गेल्या 10 ते 12 वर्षांतील नियोजित तयारीमुळे संकटाच्या काळातही भारताने परिस्थितीचा सामना केला, असे मोदी म्हणाले. आज देशात गॅस, पेट्रोल आणि युरिया उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. युरियाच्या जागतिक किमतीचा उल्लेख करताना, जगात एका पोत्याची किंमत तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचली असली तरी भारतीय शेतकऱ्यांना ते 300 रुपयांत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डीएपीची जागतिक बाजारातील किंमत पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचली असून शेतकऱ्यांना ते 1350 रुपयांत दिले जात असल्याचेही मोदी म्हणाले.
हेही वाचा : महाजन... मलई आणि बरंच काही! 'त्या' घोटाळ्याची कागदपत्रं मुंबई Tak वर
