13 वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर! आईने प्रियकराकडून करवून घेतला बलात्कार; कारण काय?
मातृत्वाला लाज आणणारी एक घटना उत्तरप्रदेशात उघडकीस आली आहे. आपल्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यास प्रकरण उघडकीस येईल या भीतीने, एका आईने आपल्याच 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
13 वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर!
आईने प्रियकराकडून करवून घेतला बलात्कार
कारण काय?
Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी एका निर्दयी आईने स्वतःच्याच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या प्रियकराकरवी बलात्कार घडवून आणला. ही घटना 26 जूनच्या संध्याकाळी घडली असून, या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील ही घटना आहे.
आई आणि प्रियकर आक्षेपार्ह अवस्थेत
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील जयराम हे उदरनिर्वाहासाठी मुंबईत काम करतात, तर त्यांची पत्नी आणि मुलगी गावातच राहत होत्या. 26 जूनच्या संध्याकाळी आरोपी आईने मुलीला दुकानातून सामान आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि संधी साधून आपला प्रियकर तसव्वुर याला घरी बोलावले. मात्र, दुकानातून मुलगी अचानक घरी परतली आणि तिने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हा सर्व प्रकार मुंबईत असलेल्या वडिलांना सांगणार असल्याचे मुलीने म्हटल्यामुळे आईची घाबरगुंडी उडाली.
हे ही वाचा : आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न
प्रियकराला नको तेच सांगितले
स्वतःचे बिंग फुटेल या भीतीने आईने आधी मुलीला डराऊन-धमकावून गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ती ऐकत नसल्याचे पाहून आईने थेट प्रियकराला चिथावणी दिली आणि तिला गप्प करण्यासाठी तिच्यावरही अत्याचार करण्यास सांगितले. आरोपी तसव्वुर याने अल्पवयीन मुलीला जमिनीवर आपटून तिच्यावर बलात्कार केला आणि धक्कादायक बाब म्हणजे जन्मदात्रीनेच या घृणास्पद कृत्यात त्याला पूर्ण साथ दिली. या भयानक घटनेनंतर आरोपी आईने आपल्या प्रियकरासोबत घरातून पोबारा केला.
हे ही वाचा : Maharashtra Weather: Depression सरकलं, पण पाऊस थांबणार नाही! पुढचे 48 तास कुठे मुसळधार पाऊस?
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा
या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने मुंबईत असलेल्या वडिलांना संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली. वडिलांनी तात्काळ गावी धाव घेतली आणि सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला. मात्र, तिथे कोणतीही सुनावणी न झाल्याने त्यांनी शेवटी न्यायालयाचे दार ठोठावले. आता न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कठोर कलमांखाली एफआयआर (FIR) नोंदवला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
