जरांगे पाटलांवर प्रश्न येताच पंकजा मुंडेंचं सॉफ्ट उत्तर, नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई तक

मी अंतरवाली सराटीत नक्की जाईन, असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या जालन्यात पत्रकारांशी बोलत होत्या. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आवाहनाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

Pankaja Munde On Manoj Jarange
Pankaja Munde On Manoj Jarange
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जरांगे पाटलांवर प्रश्न येताच पंकजा मुंडेंचं सॉफ्ट उत्तर

point

नेमकं काय म्हणाल्या?

Pankaja Munde On Manoj Jarange : राज्याच्या मंत्री आणि जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी ग्वाही दिली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी, 28 ऑगस्टला सरकारने अंतरवाली सराटी येथे चर्चेसाठी यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले होते.

अंतरवाली सराटीला जाणार का?

मनोज जरांगेंच्या गावी आंतरवाली सराटीला जाणार का असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. या विषयावर जालन्यात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, सरकार या आवाहनावर सकारात्मक विचार करत असून, जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने आपण स्वतः नक्की अंतरवाली सराटीत जाणार आहोत.

हे ही वाचा : शिंदेंचा उल्लेख करत दीपके चिडले, फडणवीस सरकारला घेरण्याचे संकेत?

अतिवृष्टी अनुदान घोटाळा

स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, नागरिकांच्या मनात तिरंग्याविषयी मोठा अभिमान असून छत्रपती संभाजीनगरमधील भव्य तिरंगा रॅलीत तरुण आणि लहान मुलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. दरम्यान, अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सात तलाठ्यांना पुन्हा नियुक्ती देण्याच्या आदेशाबाबत विचारले असता, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. 'जे तलाठी पैसे परत करतील त्यांना पुन्हा नियुक्ती दिली जाईल', असे आरोप त्यांनी फेटाळून लावले. यासंदर्भातले दावे निराधार असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हे ही वाचा : Govt Jobs : पुणे आयकर विभागात भरती सुरु, लगेच करा अर्ज

'जालना शहराचे नाव जनकपूर करा'

हिंदू महासभेने जालना शहराचे नाव बदलून 'जनकपूर' करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी राजकीय परिपक्वता दाखवत सावध भूमिका घेतली. या नामकरणाच्या मुद्द्यावर आपण वैयक्तिकरीत्या कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच, शहराचे नाव 'जालना' राहो किंवा भविष्यात 'जनकपूर' होवो, जिल्ह्याचे जे काही नाव असेल त्या जिल्ह्याची आपण पालकमंत्री म्हणून काम करत राहू, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.