Govt Jobs : पुणे आयकर विभागात भरती सुरु, लगेच करा अर्ज

मुंबई तक

पुणे आयकर विभागात विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे आयकर विभागात भरती सुरु

point

लगेच करा अर्ज

Government Jobs : पुणे आयकर विभागात विविध पदांच्या एकूण 85 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, यामध्ये विशेषतः क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीअंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड-2 ची 6 पदे, टॅक्स असिस्टंटची (TA) 40 पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफची (MTS) 39 पदे भरली जाणार आहेत. 

पात्रतेचे निकष काय?

या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड-2 पदासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, टॅक्स असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अनिवार्य आहे, तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या शैक्षणिक पात्रतेसोबतच सर्व पदांसाठी संबंधित क्रीडा पात्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये भाग घेतलेले किंवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू या भरतीसाठी पात्र मानले जातील.

हे ही वाचा : मुंबईची खबर : सेंच्युरी मिल, मुलुंड डंपिंग ग्राऊंडची जागा भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी; पण विरोध का होतोय?

'असा' करा अर्ज

वयोमर्यादेचा विचार करता 1 जानेवारी 2026 रोजी स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे, तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार राखीव वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये सामान्य प्रवर्गातील खेळाडूंना 5 वर्षे तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील खेळाडूंना 10 वर्षांपर्यंतची सूट मिळेल. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये निश्चित करण्यात आले असून नोकरीचे ठिकाण पुणे शहर असणार आहे.

हे ही वाचा : 'झेंडा फडकवायला चल,' असं सांगत घरी बोलावून तरुणावर गोळीबार

80 हजार रुपयांपर्यंत वेतन

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार असून, यात स्टेनोग्राफर व टॅक्स असिस्टंट पदासाठी पे लेव्हल 4 (25,500 ते 81,100 रुपये) तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी पे लेव्हल 1 (18,000 ते 56,900 रुपये) निश्चित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंसाठी आयकर विभागात सन्मानजनक पदावर काम करण्याची ही एक मोठी संधी आहे.