धाराशिव : चारित्र्यावर संशय,बेरोजगार इंजिनिअरने केला पत्नीचा खून; चिमुकल्याच्या डोळ्यादेखत संपवलं

मुंबई तक

Dharashiv Crime News : धाराशिवच्या कळंबमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे चार वर्षांच्या चिमुकल्यासमोर हा खून केल्याचं बोललं जातंय..

ADVERTISEMENT

Dharashiv Crime News
Dharashiv Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : चारित्र्यावर संशय,बेरोजगार इंजिनिअरने केला पत्नीचा खून

point

चिमुकल्याच्या डोळ्यादेखत संपवलं

Dharashi Crime News, गणेश जाधव : कळंब शहर परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. गणेश शिवाजी टेकाळे याच्यावर पत्नी कोमल हिच्या हत्येचा संशय असून, घटनेनंतर तो फरार झाल्याची माहिती आहे. हत्येपूर्वी पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांबाबतचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे आणि तो नातेवाईकांसह इतरांना पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी दुपारी सुमारे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने कोमलला दुचाकीवर बसवून कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव (केज) परिसरातील ज्वारीच्या शेतात नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं

पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

ज्वारीच्या शेतात नेल्यानंतर कोमलवर मारहाण करण्यात आल्याचा आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ही घटना महिलेच्या सुमारे चार वर्षांच्या चिमुकल्या मुलासमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर मुलानेच पोलिसांना घटनास्थळ दाखवल्याचे सांगण्यात येतंय. मात्र, या प्रकरणातील प्रत्येक बाबीची अधिकृत पुष्टी पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. हत्येदरम्यान आरोपीने मोबाइलवरून व्हिडिओ शूट केला. त्यानंतर आरोपीने WhatsApp Status ठेवून पत्नीला शिक्षा दिल्याचा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओ आणि WhatsApp Statusमुळे पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं