बायकोला आलेले मेसेज पाहिले, पतीनं कट रचून रॉडने बेदम मारलं, 18 वर्षीय तरूणाचा खून
Mauli Giri Case Dharashiv : धाराशीवच्या पाभ्रुड गावात राहणाऱ्या माऊली गिरीचं एका तरुणीशी प्रेम जडलं होतं. दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागताच मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने तरुणीचं लग्न लावून दिलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून तरूणाची हत्या
विवाहितेला केलेला मेसेज नवऱ्यानं पाहिला
विवाहितेच्या पतीनं कट रचून तरूणाला मारलं
Dharashiv Crime : धाराशीवच्या भूम तालुक्यातील पाभ्रुड गावात प्रेम प्रकरणातून गुंडांच्या टोळीनं एका मुलाला बेदम मारलं. लोखंडी रॉड, काठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत मुलाला सोडून दिलं. त्यानंतर गेल्या 14 दिवसांपासून बेशुद्धावस्थेत असलेल्या माऊली गिरीवर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आरोपींनी केलेल्या मारहाणीनंतर माऊलीचे जगण्याचे सगळे प्रयत्न अपुरे ठरले. 18 वर्षांच्या माऊली गिरीचा अखेर मृत्यू झाला.
मृत तरुणाचे वडील बाबासाहेब गिरी यांच्या तक्रारीवरून धाराशीव पोलिसांनी सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. चौघांना अटक झालीय, तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत.
हे ही वाचा >> Pandharpur : विठुरायाच्या दारातले पंखे फक्त मंत्र्यांसाठी? महिलेनं मुश्रीफांना जाब विचारला, व्हिडीओ व्हायरल
धाराशीवच्या पाभ्रुड गावात राहणाऱ्या माऊली गिरीचं एका तरुणीशी प्रेम जडलं होतं. दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागताच मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने तरुणीचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतरही माऊलीचं प्रेयसीसोबत बोलणं सुरू होतं. माऊलीने केलेला मेसेज प्रेयसीच्या नवऱ्याने पाहिला आणि तिथून माऊलीच्या हत्येचा कट रचला गेला.
3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता परंड्याच्या पांढरेवाडीतून आरोपींनी माऊली गिरीला उचललं, आधी त्याचा फोन बंद केला मग त्याला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं. लोखंडी रॉड, काठ्या आणि धारदार शस्त्रांनी माऊलीवर वार करण्यात आले. मार- मार मारल्यानंतर आता माऊली जगणार नाही, असं समजून आरोपींनी काळेवाडी परिसरातील रस्त्यावर त्याला फेकून दिलं.









