Maharashtra Crime : धुळे हादरलं! 22 वर्षीय तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

ADVERTISEMENT

dhule crime news 22 year old girl murder nakashe road balaji nagar dhule news shocking crime story
dhule crime news 22 year old girl murder nakashe road balaji nagar dhule news shocking crime story
social share
google news

Dhule Crime News : धुळे (Dhule) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरूणीची (Girl Kill) निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. धारदार शस्त्राने तरूणीचा गळा चिरून  हत्या केल्याची ही घटना आहे. निकिता पाटीले असे या मृत तरूणीचे नाव आहे. नकाने रोड परिसरातील तिच्या राहत्या घरी हे संपूर्ण हत्याकांड घडलंय. या घटनेने परीसरात खळबळ माजली आहे. दरम्यान आता या तरूणीची हत्या कुणी केली? याचा तपास पोलीस (Police) करत आहेत. (dhule crime news 22 year old girl murder nakashe road balaji nagar dhule news shocking crime story)

धुळे (Dhule) शहरातील नकाने रोड भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे पाटील कुटुंबीय राहते. त्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाटील कुटुंब घराबाहेर गेले होते. घरात फक्त पाटील यांची 22 वर्षीय तरूणी निकिता पाटील एकटीच होती. निकिता घरी एकटीच असल्याचे संधी साधुन हे हत्याकांड घडवण्यात आले आहे.

हे ही वाचा : MLA Disqualification: ‘ठाकरेंचा ‘तो’ व्हिप बोगस, खोटा..’, शिंदेंच्या वकिलांचा खळबळजनक आरोप

निकिता घरी एकटी असल्याचे पाहून आरोपीने घरात येऊन धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहे.यावेळी पोलिसांनी संपुर्ण घटनेचा तपास सूरू केला आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टममार्टमसाठी पाठवला आहे. आता या पोस्टममार्टम अहवालातून मृत्यू मागचे कारण समोर येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान आता निकिता पाटीलची नेमकी हत्या कोणी केली? याचा तपास सूरू आहे. आरोपीने तरूणीची हत्या करताना घरात जबरदस्तीने घुसखोरी केली आहे का? या संबंधित पुरावे पोलीस शोधतायत. तसेच आरोपी ओळखीतला तर नाही ना? या सर्व दिशेने पोलिसांकडून शोध सुरु आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Chandrakant Bawankule: भारतात येताच बावनकुळेंची कॅसिनोतील ‘त्या’ फोटोवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तरुणीच्या हत्येचे नेमक कारण समजू शकले नाही आहे. तरुणीची हत्या कोणी व कशासाठी केली ? याचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे. दरम्यान या घटनेचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे नोंदविण्याचे काम सुरू होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT