Elvish Yadav: क्रोबा कांडचा आरोपी एल्विश यादववर ईडीची मोठी कारवाई, संपत्तीच केली जप्त
Elvish Yadav Property: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) यूट्यूबर एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
यूट्यूूबर एल्विश यादववर मोठी कारवाई
ईडीकडून एल्विश यादवची संपत्ती जप्त
सापांचं विष विकत असल्याचा आरोप
ED massive action against YouTuber Elvish Yadav: नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) यूट्यूबर एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त केली आहे. तपास यंत्रणेने ही संपत्ती यूपी-हरियाणामध्ये जप्त केली आहे. ईडीने यापूर्वीच एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांचे जबाब नोंदवले आहेत आणि त्या दोघांचीही बऱ्याचदा चौकशी केली आहे. (ed action on cobra scandal accused youtuber elvish yadav property seized)
एल्विशने रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. यासाठी मिळालेल्या पैशांच्या व्यवहाराशी संबंधित प्रकरणी ईडीने एल्विश आणि इतरांची चौकशी केली होती, त्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> महालक्ष्मीचे 32 तुकडे कोणी केले, अनैतिक संबंध अन् हत्या..? 'त्या' घटनेची Inside Story
उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा) जिल्हा पोलिसांनी एल्विश आणि त्याच्याशी संबंधित लोकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर आणि पीएमएलए अंतर्गत आरोप दाखल केल्यानंतर केंद्रीय एजन्सीने मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. तर हरियाणाचा गायक राहुल यादव उर्फ राहुल फाजिलपुरिया याचे एल्विश यादवसोबत संबंध आहेत, त्याचीही ईडीने याप्रकरणी चौकशी केली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
एल्विशला पोलिसांनी 17 मार्च रोजी केलेली अटक
पार्ट्यांमध्ये करमणुकीसाठी सापाच्या विषाचा संशयास्पद वापर केल्याच्या चौकशीच्या संदर्भात नोएडा पोलिसांनी 17 मार्च रोजी एल्विश यादवला अटक केली होती. त्याने आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये सापाचे विष वापरले गेल्याचा आरोप त्याच्यावर होता. वादग्रस्त YouTuber आणि रिॲलिटी शो बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव याच्यावर नोएडा पोलिसांनी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा>> Crime News: तरुणीचे नग्न फोटो आणि Video व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलात्कार
एनजीओच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली
प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था पीपल फॉर ॲनिमल्सच्या तक्रारीवरून नोएडातील सेक्टर 49 पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये एल्विश यादव याचा समावेश होता. नोव्हेंबरमध्ये, इतर पाच आरोपी जे सर्व सर्पमित्र होते त्यांनाही अटक करण्यात आली आणि नंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी बँक्वेट हॉलमधून 5 सर्पमित्रांना केलेली अटक
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी नोएडा येथील बँक्वेट हॉलमधून अटक करण्यात आलेल्या 5 सर्पमित्रांच्या ताब्यातून 5 कोब्रासह 9 साप जप्त केले होते, तर 20 मिली सापाचे विषही जप्त करण्यात आले होते. तथापि, पोलिसांनी सांगितले होते की एल्विश यादव बँक्वेट हॉलमध्ये उपस्थित नव्हता पण ते या प्रकरणात त्याच्या भूमिकेची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
मात्र, यावर्षी एप्रिलमध्ये नोएडा पोलिसांनी या प्रकरणी 1,200 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सापांची तस्करी, अंमली पदार्थांचा वापर आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन या आरोपांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
ADVERTISEMENT