फॅशन डिझायनर तरूणीची आत्महत्या, पण शेवटचा व्हि़डिओ का होतोय व्हायरल?
Muskan Narang video : उत्तर प्रदेशातील फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मुस्कान फक्त 25 वर्षाची होती. या घटनेने कुटूंबियांना मोठा हादरा बसला आहे. या आत्महत्येनंतर तिचा शेवटचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
Muskan Narang video : उत्तर प्रदेशातील फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मुस्कान फक्त 25 वर्षाची होती. या घटनेने कुटूंबियांना मोठा हादरा बसला आहे. या आत्महत्येनंतर तिचा शेवटचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तणावात दिसत होती. या तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे.दरम्यान पोलिस ठाण्यात हे प्रकरण पोहोचले असून, या प्रकरणात मुस्कानच्या आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. (fashion designer muskan narang suicide last instagram video viral in social media)
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडिओत काय?
मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्येपुर्वी तिचा एक व्हिडिओ अपलोड केला होता.या व्हिडिओत ती आत्महत्या करणार असल्याचे संकेत देत आहेत. मुस्कान तिच्या शेवटच्या व्हिडिओत म्हणते की, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे, यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. कोणासोबत ही तुम्ही तुमची प्रॉब्लेम शेअर केली की सर्व ठिक होते. मी माझ्या बहिणींना, आई-वडिलांना आणि मित्रांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला.पण सर्व मलाच समजावण्याचा प्रयत्न करतात,असे ती संतापून व्हिडिओत म्हणतेय.
हे ही वाचा : मुंबई हादरली! दिवसाढवळ्या गोळ्या झाडून महिलेची हत्या
पुढे मुस्कान मुस्कान (Muskan Narang) म्हणते की, मी आज जे काही करतेय, ते स्वत:च्या मर्जीने करतेय. यामध्ये कोणाचाही काही एक संबंध नाही. त्यामुळे माझ्या जाण्यावर कोणालाही दोष देऊ नका. लोक अनेकदा म्हणतात की माझ्यात आत्मविश्वासाची कमी आहे,पण मी खुप कॉन्फिडेंट आहे, असे व्हिडिओत मुस्कान म्हणतेय. हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या 24 तासाच्या आत मुस्कानने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
हे वाचलं का?
पोलिसांचे म्हणणे काय?
मुस्कानने (Muskan Narang) स्वत:च्याच घरीच आत्महत्या केली होती. कुटुंबियांना ही घटना कळताच पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बॉडी ताब्यात घेत पोस्टमार्टमला पाठवली. कोणत्या तरी त्रासामुळे किंवा चिंतेतून तिने आत्महत्या केल्याची माहिती मुस्कानच्या कुटूंबियांनी दिली आहे. पोलिस मात्र कुटूंबियांच्या या उत्तरावर संतुष्ट नाही आहेत. तसेच पोलिसांना देखील मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे. दरम्यान या घटनेत पोलीसांचा कसून तपास सूरू आहे. आता या प्रकरणात आत्महत्येमागचं काय कारण समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT