VIDEO: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरेंची एंट्री, पुण्यातील खास 'ठाकरी' भाषण एकदा ऐकाच!

मुंबई तक

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत सरकारी धोरण, पेपरफुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या वाया जाणाऱ्या वर्षांवर तीव्र भाष्य केले.

ADVERTISEMENT

raj thackeray mpsc students protest pune paper leak jobs marathi youth
Raj Thackeray on MPSC
Google CTA

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय भाषणापेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापात सहभागी होण्यासाठी आपण आलो असल्याचं सांगत ‘तुम्हाला आलेला राग तात्पुरता असू नये’, असं आवाहन केलं. सरकारी धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

‘तुमच्या रागात सहभागी व्हायला आलोय’

राज ठाकरे म्हणाले की, “मी आज जो आलोय, तो फक्त तुमच्या रागात सामील व्हायला आलोय.” विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संताप केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहू नये, तर त्यातून सरकारवर दबाव निर्माण झाला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारी फसवणुकीमुळे आयुष्यातील उमेदीचा काळ कसा जातो, हे आपल्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी आपला अनुभव जोडला.

‘तुमच्याकडे पेपर फुटतायत, आमच्याकडे मतं फुटतायत’

राज ठाकरे यांनी पेपरफुटी आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची तुलना करत “तुमच्याकडे पेपर फुटतायत, आमच्याकडे मतं फुटतायत. बळी दोघं जातो आहोत,” असं वक्तव्य केलं.