शिक्षिकेच्या डोक्यावर सपासप वार करुन हत्या, शिक्षक का झाला क्रूर?

मुंबई तक

फतेहपूरमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने त्याच्या शिक्षक पत्नीचा खून केला. तिच्या डोक्यावर वार करुन तिला संपवले आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी बनाव रचला. नेमकी काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेच्या डोक्यावर सपासप वार करुन हत्या

point

शिक्षक का झाला क्रूर?

Crime News : एका शिक्षकानेच आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. आरोपी पतीने आधी पत्नीच्या डोक्यावर गंभीर वार केले आणि त्यानंतर तिला पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवून मारून टाकले. हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने पत्नीचा पाय पायऱ्यांवरून घसरून ती टबमध्ये पडल्याची खोटी कथा रचली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असता पतीचा हा कट उघडकीस आला. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न

या भागात गेल्या सहा महिन्यांपासून भाड्याने राहणारे 30 वर्षीय दिलीप यादव हे शासकीय शिक्षक असून त्यांची 28 वर्षांची पत्नी शालिनी यादव एका खासगी शाळेत शिकवत होती. 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला असून त्यांना आठ वर्षांचा एक मुलगाही आहे. शनिवारी (8 ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास दिलीप याने पोलिसांना माहिती दिली की, तो सकाळी फिरायला गेला असताना पत्नीचा अपघात झाला आणि टबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. त्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे ही वाचा : तरुणानं अंघोळीचा व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग अन्..

सासूचा जावयावर गंभीर आरोप

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मृत शालिनीच्या डोक्यावर आणि पायावर गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले, ज्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दाव्यावर संशय निर्माण झाला. तपासात तिच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने अनेक वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले, तसेच रक्ताने माखलेल्या कपड्यांमुळे या हत्येचा पर्दाफाश झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत शिक्षिकेच्या आईने आपल्या जावयावरच हत्येचा गंभीर आरोप केला आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारांहून अधिक पगार

मृत्यूचे नेमके कारण काय?

प्रथमदर्शनी हे हत्येचेच प्रकरण असल्याचे स्पष्ट होत असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संशयित आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी नातेवाइकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून तो आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.