Crime : मुलगी दलित मुलाच्या प्रेमात, बापाने फावड्याने दोघांचेही केले तुकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

father who was upset due to his daughters love affair broke the shovel with the beloved girl
father who was upset due to his daughters love affair broke the shovel with the beloved girl
social share
google news

UP Crime : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यामध्ये कोतवाली बिलसी येथे मुलीच्या प्रेमप्रकरणावरून (Love Affairs) संतापलेल्या वडिलांनी मंगळवारी सकाळी मुलगी आणि तिच्या प्रियकराची (Boyfriend) फावड्याने हत्या (Murder) केली. त्यानंतर त्याच वडिलानी रक्ताने माखलेले फावडे घेऊनच पोलीस ठाणे गाठल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेहांची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलीच्या वडिलाना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

कुटुंबीयांची अब्रू गेली

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महेशची मुलगी नीतू ही गावातील एका दलित मुलाच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे कुटुंबीयांचा बदनामी झाल्याचा राग मुलीच्या वडिलाच्या मनात होता. त्या दोघांचे प्रेमप्रकरण घरात समजले होते. त्यानंतर वडिलांनी मुलीला आणि मुलालाही समज दिली होती. मात्र तरीही ती दोघं एकमेकांना भटेत होती, त्यामुळे आपली अब्रू जात असल्याचे मत मुलीच्या वडिलांचे होते. त्याच रागातून मुलीच्या वडिलाने मुलीचा प्रियकर सचिन (वय 20) आणि मुलगीची फावड्याने हत्या केली.

हे ही वाचा >> महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार! शिंदेचे 7 खासदार, तर काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या वाटेवर

मध्यरात्री सचिन घरात घुसला

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सचिन सोमवारी मुलीला भेटण्यासाठी मध्यरात्री तिच्या घरी गेला होता. नितूच्या घरी गेल्यानंतर ती दोघंही घराबाहेर बोलत बसली होती. मात्र पहाटे साडेचार वाजता ती दोघं बोलत बसल्याचे त्यांच्या घरात्यांचे लक्षात आले.

हे वाचलं का?

फावड्याने तुकडे केले

सचिन घराच्या अंगणात आल्याचे समजताच घरातील सगळ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी घरातील फावडा आणून आधी मुलीची हत्या केली त्यानंतर सचिनचेही त्याच फावड्याने तुकडे केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात दोघांनाही टाकून वडिलाने पोलीस ठाणे गाठले आणि आपण दोघांची हत्या केल्याचे सांगितले.

हे ही वाचा >>धावपट्टीवरच भरधाव दोन विमानांनी घेतला पेट अन्…, 379 प्रवाशांचे झालं काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT