महिला कॉन्स्टेबलने केली हेड कॉन्स्टेबल चंद्रकांतची पोलखोल! कारमध्ये झाला होता 'तो' घाणेरडा खेळ

मुंबई तक

एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या सहकारी पुरुष कॉन्स्टेबलवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

महिला कॉन्स्टेबलने केली हेड कॉन्स्टेबल चंद्रकांतची पोलखोल!

point

कारमध्ये झाला होता 'तो' घाणेरडा खेळ

Crime News : काही दिवसांपूर्वी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने तिच्या सहकारी पुरुष कॉन्स्टेबल चंद्रकांतवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप केले होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत तिला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत होता. 21 मार्च रोजी मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने तिला बोलावून घेतले आणि कारमध्ये ओढून बलात्काराचा प्रयत्न केला. यानंतर तिने आरडाओरडा केल्यावर आरोपी तिच्या स्कूटीची चावी घेऊन पळून गेला. मात्र पोलिस तपासात काहीतरी वेगळीच माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ परिसरातील ही घटना आहे.

खात्यात 40 ते 50 हजार ट्रान्सफर

मेरठ पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला असता कथेत एक वेगळेच वळण मिळाले आहे. एसपी सिटी आयुष विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी महिला शिपायाच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात 40 ते 50 हजार रुपये ट्रान्सफर झाले आहेत. इतकेच नाही तर, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला पोलीस शिपाई स्वतःहून आरोपीसोबत बसून जाताना दिसत आहे. यामुळे सुरुवातीला करण्यात आलेला अपहरणाचा दावा पोलिसांना संशयास्पद वाटत असून, या दोघांमध्ये पैशांवरून जुना वाद असल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला! वर्दीमागचं रक्तरंजित रहस्य, मुलीनेच घडवून आणली पोलीस बापाची हत्या; प्रियकराने 3 वर्षांनी उघड केला कट

चंद्रकांतला नोटीस

पोलिसांनी आरोपी हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत याला त्याची बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. पोलीस आता या प्रकरणाची तांत्रिक आणि कागदोपत्री पडताळणी करत असून, हा खरोखरच लैंगिक छळाचा प्रकार आहे की आर्थिक वादातून करण्यात आलेली तक्रार, याचा शोध घेत आहेत. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित हे प्रकरण असल्याने विभागात याची मोठी चर्चा सुरू आहे.

हे वाचलं का?