दोन बायकांपासून 18 मुलं, भावाच्या मदतीने अनैतिक संबंधातून पुरुषाची हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरून पाण्यात फेकला

मुंबई तक

Crime News : काही दिवसांपासून बेपत्ता असलेले गुलसहन उर्फ मुन्ना (वय 50) यांची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला दोन पत्नी असून त्यांच्यापासून त्याला 18 मुलं आहेत. ते काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यांचा मृतदेह हा एका पोत्यात बांधून कालव्यात फेकून दिल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं भावाची मदत घेऊन मुन्नाची केली हत्या

point

मुन्नाला दोन्ही पत्नींपासून तब्बल 18 मुलं

Crime News : काही दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी गुलसहन उर्फ मुन्ना (वय 50) यांची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला दोन पत्नी असून त्यांच्यापासून त्याला 18 मुलं आहेत. ते काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यांचा मृतदेह हा एका पोत्यात बांधून एका कालव्यात फेकून दिला होता. सीडीआरनुसार, पोलिसांनी माहिती मिळवली की, ही घटना एका महिलेसह तिच्या भावाने केलेल्या तीन आरोपींनी घडवून आणली. महिलेला ताब्यात घेत नंतर चौकशी करण्यात आली. 

हे ही वाचा : MBBS तरुणीने मांजर पाळली, कुटुंबीयांनी घातला वाद, अखेर महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल

मुन्ना हा 18 मार्च रोजी दुचाकीवरून बाहेर गेला होता, त्यानंतर तो कुठेच सापडला नाही. कुटुंबीयांनी काहीतरी अनुचीत प्रकार घडल्याची शंका उपस्थित केली. मुन्ना हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, तिसऱ्या दिवशी त्याची दुचाकी मौइमा कल्याणपूरजवळील महरोड येथे आढळून आली. यामुळे कुटुंबीयांच्या चिंतेत आणखी वाढ झाली. 

महिलेनं भावाची मदत घेऊन मुन्नाची केली हत्या

रविवारी सकाळी, सुमेरपूरजवळ शारदा उपनदीच्या कालव्यातील पोत्यात मृतदेह आढळून आल्याची माहिती आहे. घटनास्थळ हे मृताच्या घरापासून तब्बल 8 किमी अंतरापासून दूर आहे. पोलिसांनी तपास केला असता, तपासातून मृत व्यक्ती ज्या महिलेशी शेवटचं बोलला होता, त्या महिलेची माहिती मिळवण्यात आली, नंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान, तिने तिचा भाऊ आणि एका साथीदारासोबत मिळून मुन्नाची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचा कबुलीनामा दिला. 

हे ही वाचा : प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाची नग्न धिंड काढली, जळगावातील भुसावळमध्ये लाज आणणारी घटना

मुन्नाला दोन्ही पत्नींपासून तब्बल 18 मुलं

दरम्यान, मृत मुन्नाला त्याच्या दोन्ही पत्नींपासून तब्बल 18 मुलं होती. संबंधित प्रकरणात मुन्नाच्या हत्येची माहिती समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले, तसेच पोलिसांनी ही हत्या अनैतिक संबंधातून घडल्याचे सांगितले. 

हे वाचलं का?