Instagram वर मैत्री, 5 वर्ष शारीरिक संबंध अन् अचानक पाठवले मोबाइलवर ‘ते’ Video…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Girl accused punjab boy of rape for five years : इंस्टाग्राम हे सध्याच सर्वांत जास्त वापरलं जाणार सोशल मीडिया माध्यम आहे. या माध्यमातून दोन अपरीचीत व्यक्ती लगेच एकमेकांचे मित्र होतात. अशीच मैत्री एका तरूणीने एका तरूणासोबत इंस्टाग्रामवर केली होती. या मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले होते. त्यानंतर दोघांनी अनेकदा एकमेकांसोबत शारीरीक संबंध ठेवले होते. मात्र आता तरूणीचा संपूर्ण वापर करून घेतल्यानंतर तरूण पळवाट शोधतोय.या प्रकरणात आता तरूणीने पोलिसात (Police) धाव घेतली आहे. (frindeship on instagram a girl accused punjab boy of rape for five years shocking story)

30 वर्षांची आदिवासी तरूणी (Trible Girl) 2018 साली इंस्टाग्रामवर राहूल डांग नावाच्या एका तरूणाला भेटली होती. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो केले होते. त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर चॅट सुरु झाल्या होत्या. हळूहळू दोघेही एकमेकांचे घट्ट मित्र बनले होते. पुढे जाऊन या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

हे ही वाचा :  4 महिन्यांचं प्लॅनिंग, सिक्रेट सिमकार्ड अन् सासू-सासऱ्यांची हत्या…

प्रत्येक भेटीत हॉटेलमध्ये न्यायचा…

राहूल हा पंजाबमध्ये राहायचा तर तरूणी ही भोपालमध्ये राहायची. या दरम्यान प्रेमात पडल्यानंतर राहूल अनेकदा तरूणीला भेटायला भोपाळला यायचा. लग्नाची हमी देऊन तो प्रत्येक भेटीत तरूणीला लॉजवर नेऊन शारीरीक संबंध प्रस्थापित करायचा. साधारण पाच वर्ष हे जोडंप या नात्यात होते. या दरम्यान अनेकदा तरूणीला लॉटवर नेऊन तिच्यासोबत संबंध ठेवले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

अनेक वर्ष नात्यात राहिल्यानंतर तरूणीने राहूलवर लग्नासाठी दबाव टाकला होता. मात्र त्याने नकार देत तिला तिचेच अश्लील व्हिडिओ पाठवले होते. हे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. या धमकीनंतर तरूणीने थेट बैतूल पोलीस स्टेशन गाठत बॉयफ्रेंडची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस या घटनेचा तपास करतातय.

हे ही वाचा : 17 वेळा प्रेग्नेट, रक्तापासून केक तर मृतदेहापासून… हादरवून टाकणारी कहाणी

तरूणीचे 5 वर्षापुर्वी इस्टाग्रामवर राहूल डांगशी मैत्री झाली होती आणि त्याने लग्नाचे वचन दिले होते. या दरम्यान त्याने 5 वर्ष त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरीक संबंध ठेवले,अशी माहिती तरूणीच्या वकिलाने दिली. शाहपूर पोलीस ठाण्यात तरूणीने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार घटनेचा तपास सुरु आहे, अशी माहिती बैतूलचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक नीरज सोनी यांना दिली.

ADVERTISEMENT

दरम्यान ही घटना मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) घडली आहे. या घटनेचा तपास पोलीस करतायत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT