बाप्पाच्या मिरवणुकीत अनर्थ!, डीजेच्या दणदणाटात सांगलीत 2 युवकांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sangli Islampur and Tasgaon talukas two youths have died of heart attack due to the loudness of the dj Action against 76 Ganesh Mandals in that case.
Sangli Islampur and Tasgaon talukas two youths have died of heart attack due to the loudness of the dj Action against 76 Ganesh Mandals in that case.
social share
google news

Ganesh Visrjan: राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागात गणेशोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. गुरुवारी अनंत चतुर्थीदिवशी बाप्पांचे विसर्जन करत असताना मात्र महाराष्ट्रातील काही भागात साऊंड सिस्टिममुळे दुर्देवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला (Visrajan Mirvanuk) गालबोट लागले आहे. पुणे, सांगली जिल्ह्यात साऊंड सिस्टिमवर (Sound system) आवाजाच्या मर्यादा सांभाळल्या नसल्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. तर याच डीजेच्या (DJ) आवाजामुळे मात्र सांगली जिल्ह्यातील दोन युवकांचा मृत्यू (Two young boy death) झाल्याने कुटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला आहे. (ganesh visrajan mirvanuk dj sound system heart attack two youths death police case sangli)

ADVERTISEMENT

मिरवणुकीमुळे 76 मंडळांवर कारवाई

सांगली जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देण्यात येत होता. त्यावेळी डीजेच्या तालावर बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक चालू होती. आवाजाची मर्यादा पाळण्यात आली नसल्याने सांगली जिल्ह्यात मात्र दोन युवकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दुधारीतील 11 जणांविरोधात शांतता भंग केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. इस्लामपूर पोलिसांकडून 76 मंडळांवर कारवाई करण्यात आली असून गुन्हे नोंद करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

हे ही वाचा >> नाशिकमध्ये बाप्पाला निरोप देताना काळाने साधला डाव! दोघांचा मृत्यू, तर दोघांचा…

डीजेच्या आवाजाने झटका

राज्यातील काही भागात सातव्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येतो. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील कवठेएकंदमधील शेखर पावसे हा मिरवणुकीत सहभागी झाला होता. तर वाळवा तालुक्यातील दुधारीमध्येही मोठ्या उत्साहात मिरवणूक सुरु होती. त्यावेळी डीजेच्या तालावर मिरवणूक चालू असतानाच या दोघा तरुणांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

नाचत असतानाच अनर्थ

मिरवणुकीत नाचत असताना शेखर पावसेला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तो घरी गेला. त्यानंतर घरातच त्याला भोवळ आली. त्यानंतर त्याला तासगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले.

हे ही वाचा >>  Manipur Violence : मुख्यमंत्र्यांचं वडिलोपार्जित घर जाळण्याचा प्रयत्न

शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

दुधारीतही गणेश विसर्जन मिरवणूक डीजेच्या तालावर जोरदार सुरु होती. त्यावेळी शिरतोडे हा तरुण मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. मित्रासोबत असतानाच त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याला तातडीने इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. 10 दिवसापूर्वीच त्याची अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ही दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. सांगली जिल्ह्यातील या दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र 125 मंडळाच्या साऊंड सिस्टिमची तपासणी करण्यात आली. त्यानंतर 73 मंडळाच्या मिरवणुकीवर कारवाई करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT