AI चा प्लॅन अन् तळघरात सापडला वैभवचा मृतदेह, शिक्षकाला अटक; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

Gorakhpur Crime News : गोरखपूरमध्ये 10 वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी संगणक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून खंडणीसाठी अपहरणाचा कट रचल्याचा दावा समोर आला आहे.

ADVERTISEMENT

Gorakhpur Crime News
Gorakhpur Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

AI चा प्लॅन अन् तळघरात सापडला वैभवचा मृतदेह

point

शिक्षकाला अटक; नेमकं प्रकरण काय?

Gorakhpur Crime News  : गोरखपूरमध्ये घडलेल्या 10 वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चौथीत शिकणारा वैभव दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर आपली नवी सायकल घेऊन घराबाहेर पडला, मात्र त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा कोणताही मागमूस लागला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो घराजवळील गल्लीत गेल्यानंतर गायब झाल्याचे दिसून आले. त्याच परिसरात संगणक शिक्षक सर्वेश भट्ट राहत होता. तपासादरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये सर्वेश एका शेतात मुलाची चप्पल फेकताना दिसला. त्याच शेताजवळ वैभवची सायकलही आढळून आली. यानंतर अपहरणाचा संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी सर्वेशला ताब्यात घेतले.

हेही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं

वैभवचा मृतदेह तळघरात सापडला 

सर्वेश भट्टला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. मात्र, त्याच्या घराची सुरुवातीला सखोल झडती घेण्यात आली नाही. त्यामुळे वैभवचा मृतदेह त्याच घराच्या तळघरात असूनही तो लगेच सापडला नाही. सुमारे 17 तास चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस आरोपीला घेऊन त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा तळघरात गोणीत भरून ठेवलेला वैभवचा मृतदेह ताब्ताय घेण्यात आला. आरोपी आधीपासून पोलिसांच्या ताब्यात असतानाही मृतदेह शोधण्यासाठी इतका वेळ का लागला, तसेच सुरुवातीच्या झडतीत तळघराची तपासणी का झाली नाही, यावर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पोलिसांच्या तपास पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

हेही वाचा : आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या; 10 दिवसांनी झाला उलगडा