Surat Suicide : 20 लाखाने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा जीव, बंद घरात काय घडलं?
सुरतमध्ये (Surat) सात जणांच्या सामूहिक आत्महत्येप्रकरणी (Suicide Case) सुरत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या घटनेच्या 12 दिवसांनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Surat Crime News : सुरतमध्ये (Surat) सात जणांच्या सामूहिक आत्महत्येप्रकरणी (Suicide Case) सुरत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या घटनेच्या 12 दिवसांनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव इंदरपाल शर्मा असून तो मयत मनीष सोलंकीचा व्यावसायिक भागीदार आहे. दोघेही फर्निचर व्यवसायात भागीदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदरपालला मनीष सोलंकीकडून 20 लाख रुपये घ्यायचे होते. दिवाळीपर्यंत पैसे परत करण्यासाठी इंदरपाल मनीषवर दबाव आणत होता. (Gujrat Crime suicide mystery of 7 members family in Surat is finally revealed what actually happened Get Know)
ADVERTISEMENT
दिवाळीपर्यंत पैसे परत करण्यासाठी वारंवार दबाव
या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी राकेश बारोट म्हणाले की, ’29 ऑक्टोबरला सकाळी अडाजन पोलीस ठाणे हद्दीतील पालनपूर पाटिया भागातील एका फ्लॅटमधून सात जणांचे मृतदेह सापडले होते. प्राथमिक दृष्टिकोनातून हे सामूहिक आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसते. पोलिसांनी तपास सुरू केला असता, मयत मनीष सोलंकी याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले, तर आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांचा विष पिऊन मृत्यू झाला होता.’
वाचा : Ajit Pawar: बारामतीतल्या दिवाळी पाडव्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले मी…
पोलीस तपासात हाती लागला महत्त्वाचा पुरावा
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून त्यात त्याने कोणाचेही नाव न घेता पैसे परत न मिळाल्याचे लिहिले होते. हे गूढ उकलणे पोलिसांना खूप अवघड होते. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला. यादरम्यान, पोलिसांना मृत मनीषकडून आणखी एक पत्र सापडले ज्यामध्ये त्याने त्याचा साथीदार इंदरपाल शर्मा दिवाळीपर्यंत वीस लाख रुपयांचे बिल भरण्यासाठी दबाव टाकत असल्याचे लिहिले होते.
हे वाचलं का?
वाचा : वडिलांच्या हत्येसाठी मुलाने तुरुंगातच रचला कट, अर्ध्या रात्रीच कांड फसलं अन्…
फर्निचरच्या दुकानासाठी कर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदरपाल आणि मृत मनीष यांनी भागीदारीत सुरतच्या भटार भागात निधी प्लायवूड नावाचे दुकान सुरू केले होते. मनीषचा फर्निचरचा व्यवसाय असून त्याने दुकानातून सामान घेतले होते ज्याचे पैसे त्याला द्यायचे होते. भागीदार इंदरपालने त्याला दिवाळीपर्यंत उर्वरित रक्कम भरण्यास सांगितले होते.
वाचा : भुजबळ वैफल्यग्रस्त…, मराठा आरक्षणावर बच्चू कडूंचं चावडीवर मोठं विधान
मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी एक कर्ज मंजूर
तपासादरम्यान मृत मनीषने बँकेतून कर्ज घेण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांनी सुमारे 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता, परंतु त्याचे कर्ज फेटाळण्यात आले होते. पण घटनेच्या दुसऱ्या दिवशी एक कर्ज मंजूर करण्यात आले. पोलिसांनी इंदरपाल शर्माविरुद्ध कलम 306 म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT