प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेचं 'शुद्धीकरण'; सर्वांसमोर करायला लावलं 'ते' कृत्य, व्हिडिओ व्हायरल
सुरेंद्रनगरमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या एका महिलेला अनन्वित छळाला सामोरे जावे लागले. शुद्धीकरणाच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेचं 'शुद्धीकरण'
सर्वांसमोर करायला लावलं 'ते' कृत्य
व्हिडिओ व्हायरल
Crime News : गुजरातमधील सुरेंद्रनगर येथून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत राहत असलेल्या एका विवाहित महिलेला आणि तिच्या प्रियकराला अमानुष छळाला सामोरे जावे लागले. पतीने आणि त्याच्या नातेवाईकांनी या दांपत्याचा शोध घेऊन त्यांना पकडले आणि कथित "शुद्धीकरण विधी"च्या नावाखाली त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जबरदस्तीने लैंगिक कृत्य अन्...
या अमानुष कृत्यादरम्यान आरोपींनी महिलेच्या प्रियकराला झाडाला बांधून काठीने बेदम चोप दिला. यानंतर, लोकांच्या उपस्थितीत त्याला संबंधित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, अत्याचार करणाऱ्यांनी त्या तरुणाला महिलेचे मूत्र पिण्यासही भाग पाडले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करून आरोपींनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले, ज्यामुळे या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली.
हे ही वाचा : सांगली : आईने सव्वा वर्षाच्या चिमुकलीला कात्रीने वार करुन संपवलं, जराही दया-माया दाखवली नाही
नऊ आरोपी अटकेत
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरेंद्रनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विविध पथके तैनात केली. शोधमोहिमेदरम्यान पीडित महिला सापडली असून, समुपदेशनानंतर तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांसह नऊ आरोपींना अटक केली आहे. तसेच व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.
हे ही वाचा : उल्हासनगर : गर्भवती महिला ट्रॅफिक जाममध्ये अडकली, रिक्षात दिला बाळाला जन्म
'या' कलमांतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी सुरेंद्रनगरच्या 'ए-डिव्हिजन' पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सामूहिक अत्याचार, बेकायदेशीर डांबून ठेवणे, दुखापत पोहोचवणे आणि अपहरण यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
