सांगली : आईने सव्वा वर्षाच्या चिमुकलीला कात्रीने वार करुन संपवलं, जराही दया-माया दाखवली नाही

मुंबई तक

Sangli Crime News : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील तिरमलवाडी येथे आईने चिमुकल्या मुलीवर कात्रीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सव्वा वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Sangli Crime News
Sangli Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सांगली : आईने सव्वा वर्षाच्या चिमुकलीला कात्रीने वार करुन संपवलं

point

जराही दया-माया दाखवली नाही

Sangli Crime News, स्वाती चिखलीकर : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील तिरमलवाडी येथे आईने पोटच्या सव्वा वर्षाच्या चिमुकलीवर कात्रीने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या हल्ल्यात सव्वा वर्षाच्या श्रीशा महादेव क्षीरसागर या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तिची आई अनिता महादेव क्षीरसागर (वय 26) हिला ताब्यात घेण्यात आले असून कवठेमहांकाळ पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. तिरमलवाडी हे कवठेमहांकाळ शहर तसेच शिरढोण आणि देशिंग या गावांच्या दरम्यान असलेले गाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Personal Finance: तुमच्या घरातील कोणत्या वस्तूंचा Insurance असायला हवा आणि कोणाचा नसावा?

चिमुकल्या श्रीशावर कात्रीने हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता क्षीरसागर यांचा महादेव क्षीरसागर यांच्याशी सुमारे दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. महादेव क्षीरसागर यांचे शिरढोण येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. अनिता यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सांगली येथील मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या उपचारासंबंधी अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. क्षीरसागर यांच्या घरातील काही सदस्य एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर येथे गेले असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी चिमुकल्या श्रीशावर कात्रीने हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, विवेकानंद पाटीलने नकार का दिला?