'तू मला समजून घेतले नाहीस...' 20 वर्षांनी मोठ्या वहिनीच्या प्रेमात पडला दीर, शेवटी काय घडलं?

मुंबई तक

एक 22 वर्षीय दीर आपल्या 42 वर्षीय वहिनीच्या प्रेमात पडला. एकतर्फी प्रेमात तो अगदी वेडा झाला. शेवटी वहिनीच्या नावे चिठ्ठी लिहित त्याने ग्वाल्हेरमधील आपल्या घरात आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तू मला समजून घेतले नाहीस...

point

20 वर्षांनी मोठ्या वहिनीच्या प्रेमात पडला दीर

point

शेवटी काय घडलं?

Crime News : एका 22 वर्षीय तरुण फोटोग्राफरने आत्महत्या केली आहे. यामागचं कारण समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ माजली आहे. आपल्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या वहिनीच्या प्रेमात अपयशी ठरल्याने राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी एक भावूक 'सुसाईड नोट' देखील लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या एकतर्फी प्रेमाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली असून, मृतदेह तपासणीसाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे.

बहिण खोलीत जाताच...

माँटी मोरे (वय 22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो व्यवसायिक फोटोग्राफर होता. माँटीने घरातील खोलीत गळफास लावून आपले जीवन संपवले. त्याची बहीण पल्लवी जेव्हा खोलीत गेली, तेव्हा तिला तो फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, मृतदेहाजवळून एक सुसाईड नोट हस्तगत करण्यात आली.

हे ही वाचा : नवरा ऑस्ट्रेलियाला गेलाय, बायको 2 वर्ष सांगत राहिली, शेवटी दृश्यम स्टाईल ट्वीस्ट

'मी तिच्याशिवाय जगू शकत नाही...'

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 10 वी उत्तीर्ण असलेला माँटी आपल्या नातेसंबंधातील एका 42 वर्षीय वहिनीवर एकतर्फी प्रेम करत होता. सुसाईड नोटची सुरुवात त्याने 'सॉरी' लिहून केली आहे. यात त्याने लिहिले आहे की, "आई, ताई मी तुम्हा सर्वांना सोडून जात आहे, मला माफ करा. माझ्या या पावलाला ती जबाबदार आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय जगू शकत नाही. ती मला मिळाली नाही, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. मी तिच्यावर किती प्रेम करत होतो हे तिला सांगा आणि माझ्यामुळे तिला कोणीही काही बोलू नका."

हे ही वाचा : 'अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दिपके'; रामदास आठवलेंची भन्नाट कविता ऐकाच

'मला तू समजून घेतलं नाहीस...'

माँटीने सुसाईड नोटमध्ये भावजयीचा मोबाईल नंबरही लिहिला असून त्यावर 'मेरी जान' आणि 'आय लव्ह यू' असे शब्द लिहिले आहेत. नोटच्या शेवटी त्याने कुटुंबीयांबद्दलचे दु:ख व्यक्त करत लिहिले की, "तुम्हा सर्वांना मी इतका वाईट वाटत होतो, म्हणून मी जात आहे. आई, तू म्हणायचीस ना की मरून जा, तर हे बघ मी मरत आहे." तसेच वहिनीचा उल्लेख करत त्याने लिहिले, 'तू मला समजून घेतले नाहीस. माझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस आणि मला मरणानंतर न्याय हवा आहे.' पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भावजयीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्यानंतर तो मानसिक तणावाखाली होता. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.