Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

hingoli crime a shocking incident the hands and feet of the father were tied and son raped the mother
hingoli crime a shocking incident the hands and feet of the father were tied and son raped the mother
social share
google news

Son Raped on Mother: कळमनुरी (हिंगोली): माय-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी आणि प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकणारी घटना हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही? या कारणावरून दारू पिऊन आलेल्या मुलाने (Son) वडिलांचे हातपाय बांधून जन्मदात्या आईवरच बलात्कार (Rape on Mother) केल्याची अत्यंत किळसवाणी आणि चीड आणणारी घटना समोरी आली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात रविवारी (21 मे) गुन्हा दाखल झाला आहे. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी मुलाच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. (hingoli crime a shocking incident the hands and feet of the father were tied and son raped the mother)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा गावातील एक कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मात्र, ऐन वयात आलेला मुलगा दारूच्या आहारी गेला. तो रोज आई-वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करायचा. तसंच नेहमी याच गोष्टीवरून प्रचंड त्रास देखील द्यायचा. यावरून आई-वडील आणि मुलामध्ये प्रचंड वादही व्हायचे.

दरम्यान, 20 मे रोजी देखील आरोपी मुलगा हा रात्री घरी प्रचंड दारू पिऊन आला. पण तरीही त्याला अधिक दारू प्यायची होती. ज्यानंतर त्याने आपल्या आईकडे आणखीन दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करायला सुरुवात केली. ज्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपी मुलाचे वडील देखील घरातच होते. ते देखील त्याला त्याच्या दारू पिण्याच्या सवयीवरुन बोलू लागले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पिवळ्या बांगड्या अन् मुंडकं छाटलेला महिलेचा मृतदेह, ‘ती’ गोणी बघून पोलिसांनाही फुटला घाम!

पण जेव्हा आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे मिळणार नाही हे लक्षात आलं तेव्हा त्याने स्वतःच्या वडिलांचे आधी दोरीने हात-पाय बांधले. त्यानंतर जन्मदात्या आईला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. पण नराधम मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या वडिलांसमोरच स्वत:च्या आईवर बलात्कार केला.

आईवरच लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलाने त्यांना धमकी देखील दिली. घडलेल्या प्रकारा संदर्भात कुठे वाच्यता केली तर जीवे मारून टाकेन अशी धमकी नराधम मुलाने आपल्या जन्मदात्यांना दिली.

ADVERTISEMENT

मात्र, या संपूर्ण घटनेने पीडित आईला प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे मुलाच्या या धमकीला अजिबात भीक न घालता पीडित आईने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि नराधम मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Rape Case: जावयाचा सासूवर बलात्कार, अश्लील फोटो काढले अन् म्हणाला…

कळमनुरी पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी मुलाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही तासात त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेने अवघ्या हिंगोली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. खरं तर मुलं ही आई-वडिलांचा आधार असतात. त्यांच्यासाठी आई-वडील हे आपल्या संपूर्ण आयुष्यात जीवाचं रान करतात. मात्र, कळमनुरीमधील या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT