Chhatrapati Sambhaji nagar Crime : आईनेच 20 वर्षाच्या लेकीला पेटवले, कारण ऐकून पोलिसही हादरले

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

chhatrapati sambhaji nagar crime news in marathi : mother tried to kill daughter
chhatrapati sambhaji nagar crime news in marathi : mother tried to kill daughter
social share
google news

Chhatrapati Sambhajinagar Crime News : झोपेत असलेल्या मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी मुलीच्या आईसह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Mother sets Daughter in Chhatrapati Sambhaji Nagar)

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही 20 वर्षांची आहे. ती एका खासगी कंपनीत काम करते. तरुणी तिच्या कुटुंबासोबत राहते. दरम्यान तरुणीने दिलेल्या माहितीनुसार तिची आई ही मिसारवाडी येथील शकुंतला अहिरे या महिलेकडे नेहमी जाते. धनलाभाच्या आमिषातून जादूटोण्यासाठी तिची आई या महिलेकडे जायची, असं तक्रारीत म्हटलं आहे.

धनलाभासाठी तरुणीला पेटवलं, नक्का काय घडलं?

सोमवारी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी तरुणी झोपेत होती. सकाळी 4.30 वाजताच्या सुमारास तिला अचानक पेट्रोल आणि काहीतरी जळत असल्याचा वास आला. त्यामुळे तिने अंगावरील पांघरून बाजूला करून बघितलं. त्यावेळी तिचे पांघरून जळत असल्याचे दिसले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Mumbai Crime : चुकलं की बाजूला नेऊन…; विक्रोळीत वासनांध शिक्षकाकडून 4 विद्यार्थिनींवर अत्याचार

ती जोरात ओरडायला लागली. नंतर तिने अंगावरील पांघरून फेकून दिलं आणि धावत घराच्या खालच्या मजल्यावर आली. त्यावेळी तिची आई तिथेच उभी होती. लेकीला आग लागल्याचं बघूनही महिलेने काहीच केलं नाही.

वाचा >> Vasai crime news : झोपलेल्या आईवर कुऱ्हाडीने घाव; 17 वर्षाच्या मुलाने का केली हत्या?

दरम्यान, तरुणीचा आवाज ऐकून तिचा भाऊ धावत आला. त्याने त्यांच्याकडे असलेल्या पांघरूणाने तरुणीला लागलेली आग विझवली. आग विझवल्यानंतर तरुणीने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल तिच्या आईला विचारले.

ADVERTISEMENT

‘तुझ्या मुलीला जिंवत मारून टाकल्यास धनलाभ होईल’

तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल आईला विचारले. त्यावर तिच्या आईने सांगितले की, “मला मिसारवाडी येथे राहणाऱ्या शकुंतला अहिरे या महिलेने सांगितले की, ‘तू तुझ्या मुलीला जिवंत मारून टाकल्यास धनलाभ होईल. तसेच तुझ्या मुलाचे चांगले होईल.” हे ऐकल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. ती लागलीच पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाली.

ADVERTISEMENT

आईने रोखले, तरीही केली तक्रार

आईनेच आपल्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे तरुणीला कळले. त्यानंतर ती तक्रार देण्यासाठी निघाली. पण, तिच्या आईने तिला थांबवले. मात्र, आई घरातून बाहेर गेल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या आईसह शकुंतला अहिरे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT