Sex Racket: ‘डार्क रुम’मध्ये ‘डर्टी पिक्चर’.. कुठे सुरू होतं खुलेआम सेक्स रॅकेट?
मसाजच्या नावाखाली मालक देहव्यापाराचा धंदा करत असतो. याबाबत आतापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र अजूनही अनेक भागात मजासच्या नावाखाली असे गोरंखधंदे सुरूच आहेत. दरम्यान मसाजच्या नावाखाली हा व्यवसाय कसा चालतो? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
देशात मोठ्या प्रमाणात स्पा सेंटर (Spa Center) म्हणजेच मसाज सेंटर उभारले गेले आहेत.मात्र या स्पा सेंटरच्या नावाखाली नेमका काय गोरखधंदा सुरु असतो, याचा नेहमीच पोलिसांच्या छाप्यानंतर खुलासा होत आला आहे. अनेक स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट (Sex Racket) सुरू असल्याचे अनेक छाप्यातून समोर आले आहे. मसाजच्या नावाखाली मालक देहव्यापाराचा धंदा करत असतो. याबाबत आतापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र अजूनही अनेक भागात मजासच्या नावाखाली असे गोरंखधंदे सुरूच आहेत. दरम्यान मसाजच्या नावाखाली हा व्यवसाय कसा चालतो? हे जाणून घेऊयात. (how run spa center behind sex racket read full crime story)
ADVERTISEMENT
काही दिवसांपु्र्वीच गाजियाबादच्या कौशांबी येथील पॅसिफीक मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर (Sex Racket) पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी 99 तरूणींना तर काही तरूणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यासाठी चक्क पोलिसांना एक बस बुक करावी लागली होती. तसेच पोलिसांनी ज्यावेळेस स्पा सेंटरवर छापा टाकला होता, तेव्हा अनेकांच्या शरीरावर कपडे देखील नव्हते, इतक्या मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय चालायचा.
हे ही वाचा : Sakshi Murder : 24 महिन्यांपूर्वी भेटला अन् जीव घेऊनच थांबला, कोण आहे साहिल?
तसेच यापुर्वी देखील दिल्लीच्या V3S मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली खुलेआम सुरु असलेल्या सेक्स ऱॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी 9 जोडप्यांना ताब्यात घेतले होते. यामध्ये मॅनेजरला देखील अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये देखील अशाच एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यातून पोलिसांनी 26 तरूणांना आणि तरूणींना ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये देह व्यापारासाठी इतर राज्यातून मुली आणल्या गेल्या होत्या.
हे वाचलं का?
कसा चालतो हा सेक्स रॅकेट…
देशातील अनेक स्पा सेंटरमध्ये सुरूवातीला ग्राहक मसाजच्याच नावाखाली येतात. मात्र नंतर त्यांना सेक्सची ऑफर दिली जाते.ज्यामध्ये मुलीपासून जागेपासून सर्व सुरक्षेची हमी ग्राहकाला पुरवली जाते.विशेष म्हणजे या स्पा सेंटरमधल्या मुली कमी वयाच्या असतात. काही मुलींना परराज्यातून आणले जाते, तर काहींची विविध आमीष देऊन फसवणूक करून त्यांना या देह व्यापारात ढकलले जाते. अशा प्रकारे स्पा सेंटरमधील ग्राहकांसाठी मुली उपलब्ध करतात.
स्पा सेंटरकडून ग्राहकांसाठी पॅकेज पुरवले जाते. या पॅकेजनुसार त्यांना त्यांच्या आवडत्या मुलीसोबत वेळ घालवता येतो.यानुसार ग्राहकांच्या अपॉईटमेंट ठरवल्या जातात. इतकेच नाही तर ग्राहकांची एक चैन देखील बनवली जाते. या चैनद्वारे एका एका ग्राहकाकडून दुसरा ग्राहक जोडला जातो. अशाप्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली हा संपूर्ण गोरखधंदा चालतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sakshi Murder : एक्स बॉयफ्रेंड, टॅटू अन् साहिलने गाठली क्रौर्याची परिसीमा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT