Sakshi Murder : 24 महिन्यांपूर्वी भेटला अन् जीव घेऊनच थांबला, कोण आहे साहिल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

delhi shahbad dairy sakshi murder case sahil full details delhi police
delhi shahbad dairy sakshi murder case sahil full details delhi police
social share
google news

Delhi Shahbad Dairy Sakshi Murder Case : दिल्लीच्या शाहबाद (Delhi Shahbad) डेअरी परीसरात सोमवारी 16 वर्षीय अल्पवयीन साक्षीची चाकूने (Sakshi Murder) भोसकून आणि दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली होती.या हत्याकांडानंतर संपूर्ण देश सुन्न झाला होता. या घटनेचे गाभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी (Delhi police) तपासाची चक्रे फिरवून उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातून 20 वर्षीय आरोपी साहिलला अटके केली होती. या अटकेनंतर साक्षी हत्याकांडाबाबत आणि साहिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. नेमके हे खुलासे काय आहेत? हे जाणून घेऊय़ात. (delhi shahbad dairy sakshi murder case sahil full details delhi police)

एसी रीपेअरींगचे काम करायचा

साक्षी हत्याकांडातील (Sakshi Murder) आरोपी साहिल जैन कॉलनीत आई-वडिल आणि तीन बहिणींसोबत राहायचा. तसेच तो एसी रिपेअरींगचे काम करायचा. घरातला तो एकटा कमावता मुलगा होता. मात्र इतक्या जबाबदारी खांद्यावर असून देखील तो नशेच्या आहारी गेला होता. इतकंच नव्हे तर तो माथेफिरू देखील होता. साहिलच्या सोशल मीडिया अकाऊंट देखील हाती लागले आहेत. यामधून देखील त्याच्या व्यक्तीमत्वाचा खुलासा झालाय.

हे ही वाचा : Sakshi Murder : स्नेहा, निक्की, श्रद्धा आणि निकिता; प्रियकरांच्या क्रूर कहाण्या

साहिलसाठी हिंसा,दहशत, बंदुक आणि दारू सारख्या गोष्टी सामान्य होत्या. साहिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ सापडले आहेत. यामधील एका व्हिडिओत तो दहशत निर्माण करण्याविषयी बोलतोय, या दरम्यान मागून बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो. प्रेमात पडल्यानंतर मुलगी विसरायला कशी काय सांगू शकते,अशी त्याची तक्रार आहे. तसेच त्याने बेड्या घातलेला फोटो देखील शेअर केला आहे.यासोबतच साहिल दारू आणि हुक्का पार्टी देखील करतो. साहिलने मित्रांसोबत दारू पार्टी आणि हुक्का पार्टी केल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओत तो किती नशेच्या आहारी होता, हे कळून येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

साक्षीच्या मैत्रिणीची धक्कादायक खुलासा

साहिलची जून 2021 रोजी साक्षीशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले होते. साक्षी हत्येपुर्वी मैत्रीण नितूच्या घरी राहायची. नीतूला साहिल बद्दलची संपूर्ण माहिती होती. नीतूने दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि साहिल दोघेही एकमेंकांना गेल्या 3 ते 4 वर्षापासून ओळखायचे. दोघांमध्ये अनेक काळापासून भांडण सुरु होती, अशी माहिती दिली. मात्र ही भांडणे नेमकी कोणत्या कारणावरून सुरु होती, याची माहिती तिने दिली नाही.

हे ही वाचा : Sakshi Murder : एक्स बॉयफ्रेंड, टॅटू अन् साहिलने गाठली क्रौर्याची परिसीमा

नेमकं हत्याकांड काय?

आरोपी साहिलने साक्षीला रस्त्यात रोखून तिच्याशी भांडण करायला सुरुवाता केली होती.या भांडणाच्या रागातून भररस्त्य़ातच आरोपी साहिलने खिशातून चाकू काढून साक्षीवर वार करायचा सुरूवात केली. अगदी छाती, डोक्यावर त्याने तब्बल 40 वार करून तिची हत्या केली. साहिलच्या या हल्ल्यानंतर साक्षी जागच्या जागीच खाली पडली. आरोपी साहिलचा (Sahil) राग इतक्यावर शमला नाही तर त्याने दगडाने ठेचून देखील तिची हत्या केली. एका माथेफिरूप्रमाणे त्याने हे हत्याकांड केले होते. या हत्येनंतर जमावासमोर ओरडून त्याने पळ काढला होता.

ADVERTISEMENT

आरोपी साहिलला अटक

या घटनेनंतर साक्षीच्या वडिलांनी शाहदाबाद पोलीस ठाण्यात आयपीसी धारा 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी साहिलला उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : साक्षीच्या डोक्यात 7 वेळा दगड टाकणाऱ्या साहिलचं सापडलं सोशल मीडिया प्रोफाइल!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT