बायकोचा प्रियकर, नवऱ्याने पाहिले पत्नीचे मेसेज, अन् मुलासोबत स्वत:ही…
पत्नीचे आणि तिच्या प्रियकराचे मेसेज नवऱ्याने वाचल्यानंतर बसलेल्या मानसिक धक्क्यातून त्याने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला विष पाजून आपण आत्महत्या केली आहे. त्यानंतर पत्नीने विष पिऊन आत्महत्या करुन सारं कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
ADVERTISEMENT
Suicide Case: हरियाणामधील यमुनानगरमध्ये (Hariyana Yamunanagar) विवाहबाह्य संबंधामुळे (Extramarital affair) सगळं कुटुंब उद्धवस्त झाले आहे. या प्रकरणात पती-पत्नीने विष (poison) खाऊन जीव दिला आहे, तर त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाच्या तब्बेतही नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृतांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
प्रियकराचे मेसेज वाचले पतीने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना हरियाणामधील यमुनानगरमध्ये घडली आहे. जोगिंदरनगरमध्ये राहणारे 35 वर्षाचे अरविंद कुमार जवळच्याच कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्याने पत्नीचे आणि पत्नीच्या प्रियकर यांच्यामधील झालेले बोलणे, त्यांनी एकमेकांसोबत केलेले मेसेज अरविंद कुमारे याने बघितले होते. त्यानंतर मात्र त्याने धक्कादायक पाऊल उचलत त्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला विष देऊन आपणही विष पिऊन आत्महत्या केली.
अन् पत्नीनेही घेतले विष
ही घटना घडत असताना अरविंदची पत्नी सीमा बाहेर गेली होती. मात्र ती जेव्हा घरी आली, त्यावेळी तिने ही घटना पाहताच तिला धक्का बसला होता. त्यावेळी तिला घरात विष असल्याचे लक्षात येताच तिनेही ते विष पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर अरविंद आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. तर त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाची तब्बेत गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Maratha Reservation : ‘उपोषणादरम्यान जीवाला धोका निर्माण झाल्यास…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
कॉल-व्हॉटसअप-चॅटिंग
या प्रकरणातील अरविंद यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिली असून ती चिठ्ठी त्याने पेन्सिलने 4 पानांची ही नोट लिहिली आहे. तर त्यामध्ये लिहिले आहे की, माझ्या आणि माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी. कारण माझ्या पत्नीच्या प्रियकरामुळे माझ्या घरं उद्धवस्त झाले आहे. त्यालाही कडक शिक्षा करण्याची मागणीही त्याने केली आहे. या प्रकरणात माझ्या पत्नीचे कॉल, व्हॉटसअप, चॅटिंग आणि इन्स्टाग्रामवरील सर्व तपशील काढून त्याचीही चौकशी करावी अशी मागणी अरविंद कुमारने त्या सुसाईड नोट लिहून केली होती.
नेमका दोष कोणाचा
माझ्या पत्नीनेही माझ्याविरोधात महिला पोलिसात तक्रार दिली होती. मी कामावर गेल्यानंतर तिचा फोन नेहमी व्यस्त असायचा. त्यामुळे अशी कोणती मैत्रीण होती. जी दिवसभर तिच्या बरोबर बोलत असणार. त्यामुळे माझी काही चूक असेल तर माफ करा. याविषयी शेजारी आणि आमच्या घरमालकांना तुम्ही विचारा नेमका दोष कोणाचा आहे असं अरविंद कुमार यांनी त्या चिठ्ठीत लिहिले आहे.
ADVERTISEMENT
बाळाची परिस्थिती नाजूक
या प्रकरणाची माहिती सांगताना पोलिसांनी सांगितले की, आम्हाला समजले होते की, पाच वर्षाच्या मुलाला विष पाजण्याचा प्रयत्न झाला आहे. रुग्णालयात गेल्या नंतर समजले की, पती-पत्नीच्या वादानंतर नवऱ्याने आपल्या मुलाला विष पाजून त्याला मारून आपणही आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुलाचे आई-वडील मृत झाले असून त्यांच्या मुलाची परिस्थिती नाजूक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Beed : टाकीवरून उडी मारून मराठा तरूणाची आत्महत्या, आरक्षणासाठी संपवलं जीवन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT