Crime: मी एकटीच असल्याचं सांगायची अन् हॉटेलवर बोलवायची, शारीरिक संबंधानंतर तरूणी…
राजस्थानच्या अल्वरमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गँगच्या अटकेनंतर त्यांची चौकशी केली असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. या टोळीतील तरूणी पीडित तरूणांशी मैत्री करून त्यांना हॉटेलवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करायची.
ADVERTISEMENT
राजस्थानच्या अल्वरमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गँगच्या अटकेनंतर त्यांची चौकशी केली असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. या टोळीतील तरूणी पीडित तरूणांशी मैत्री करून त्यांना हॉटेलवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. या दरम्यान संपूर्ण घटनेचे व्हिडिओ तरूणीचे साथिदार मोबाईलमध्ये कैद करून नंतर तरूणांना ब्लॅकमेल करायची. अशाप्रकारे ही टोळी सक्रियपणे गावातील नागरिकांना लुटायची. या टोळीचा आता पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (i am alone girl fell in love boy took him hotel blackmailing case alwar rajsthan crime story)
ADVERTISEMENT
फिल्मी स्टाईलने गँग अटकेत
अलवर पोलिसांच्या कंट्रोल रूमला दोन तरूण आणि एका तरूणीचे अपहरण होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींच्या गाडीचा पाठलाग करायला सुरूवात केली होती. तब्बल 250 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले होते. या कारवाईत पोलिसांनी विजय यादव मालाखेडा आणि मदनलाल सैनी नावाच्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. तसेच, भूपेंद्र मीना उर्फ मोनू उर्फ गोंदिया, वय 19 वर्षे, रा. फिरोजपूर पोलीस स्टेशन रामगढ याला देखील अटक केली.
हे ही वाचा : Kolhapur: हिंदू-मुस्लिम प्रेमी युगलाची आत्महत्या, Instagram वर ‘ते’ स्टेटस ठेवलं अन्..
या अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. या चौकशीत भूपेंद्र यादवने सांगितले की, विजय आणि मदन सिलीसीढ तलावाजवळील हॉटेलला मोनिका नावाच्या तरूणीला भेटायला गेले होते. त्यानंतर दोघांनी हॉटेलमध्ये तरूणीसोबत संबंध प्रस्थापित केले होते. या संबंधाचे व्हिडिओ मोनिकाच्या साथिदारांनी मोबाईलमध्ये काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.तसचे हे व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात पाच-पाच लाख रूपयाची मागणी करण्यात आली होती. मात्र दोन्हीही तरूणांनी पैशाची व्यवस्था न करण्यात आल्याने त्यांच्या अपहरणाचा डाव रचला होता. या दरम्यान पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
हे वाचलं का?
असे फासायचे जाळ्यात
भुपेंद्रने पुढे कशाप्रकारे पीडीत तरूणांना जाळ्यात ओढले जायचे याची माहिती दिली. भुपेंद्रच्या टोळीत मोनिका नावाची तरूणी आहे. ही तरूणी गावातील तरूणांना आणि व्यापाऱ्यांना फोन करून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची.माझा नवरा मला मारतो, माझ्यावर प्रेम करत नाही, मी एकटीच आहे, असे सांगून ती पीडितांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. पीडीत तरूण जाळ्यात फसताच त्याला हॉटेलवर बोलावून त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवायची. या सर्व संबंधाचे व्हिडिओ आणि फोटो मोनिकाचे साथीदार काढायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखात वसूली करायचे. अशाप्रकारे या गँगने गावातील अनेकांना फसवून लूटले होते.
पोलिसांनी या प्रकरणात आता मोनू, सुनील,अशोक, रिंकु, पुनियाराम, राहुल या सर्व टोळीला अटक केली आहे. या प्रकरणात अद्याप एकही तक्रार पोलीस ठाण्यात नोंद नाही. बदनामीच्या भीतीने नागरीक तक्रार टाळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणात आता अधिकचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Thane Crime: बायकोची गोळी झाडून हत्या, पुढच्याच क्षणी हार्ट अटॅकने नवऱ्याचा मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT